नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. (Sandeep Karnik)
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचा आरोप करण्यात येत होता. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना नाशिक शहरातील गुन्हेगारावर अंकुश ठेवता आले नसल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन अंकुश शिंदे यांची कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच नाशिक शहरातून उचल बांगडी करण्यात आली असून राज्य गुप्त वार्ता विशेष पोलीस महानिरीक्षकपदी त्यांची बदली करण्यात आली आहे. (Sandeep Karnik)
(हेही वाचा – MNS : दुकानांवर मराठी पाट्या; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उरले ४ दिवस; मनसेने करून दिली आठवण)
पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना संदीप मावळ गोळीबार प्रकरणात ते वादात अडकले होते. मावळ येथे ९ ऑगस्ट २०११रोजी शेतकऱ्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यात तीन शेतकरी ठार झाले होते. गोळीबाराचा आदेश तत्कालीन पोलीस अधिकक्ष संदीप कर्णिक यांनी दिला होता असा आरोप कर्णिक यांच्यावर होता. (Sandeep Karnik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community