
संदेशखालीतील महिला अत्याचार प्रकरणी अभाविपकडून मुंबई विद्यापिठाच्या कलिना कॅम्पसमध्ये तीव्र निदर्शने (ABVP Protest Mumbai University) करण्यात आली. या वेळी त्यांनी राष्ट्रपतींकडे पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. (Sandeshkhali Case)
(हेही वाचा – Facebook Instagram Down : जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; आपोआप होतेय लॉगआऊट)
राष्ट्रपतींनी पीडितांना न्याय मिळवून द्यावा
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) कार्यकर्त्यांकडून महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्कार व अत्याचाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी मंगळवार, ५ मार्च रोजी देशभरात आंदोलने केली. या अंतर्गत मुंबई विद्यापिठाच्या कलिना कॅम्पसमध्येही तीव्र निदर्शने करण्यात आली. दरम्यान संदेशखाली येथील महिला आत्याचाराच्या घटनांची दखल घेत राष्ट्रपतींनी पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अभाविपकडून करण्यात आली आहे.
आज मुंबई महानगराच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठांत संदेशखाली येथे झालेल्या घृणास्पद घटनेविरोधात निदर्शने केली.
एका महिला मुख्यमंत्र्याकडून राजकीय हेतूपोटी आरोपींना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, त्याची दखल घेत मा. राष्ट्रपतींनी पिडीतांना न्याय मिळवून द्यावा अशी… pic.twitter.com/r5qGCK8ZaD
— ABVP Mumbai (@ABVPMumbai) March 5, 2024
सरकार पुरस्कृत महिला बलात्काराच्या घटना
पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महिलांवर होणारे बलात्कार व अत्याचाराच्या घटनांना राजकीय हेतूपोटी एका महिला मुख्यमंत्र्यानी अभय देणे हे धक्कादायक आहे, असे अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “एखाद्या राज्याची महिला मुख्यमंत्री असताना राज्य सरकार पुरस्कृत महिला बलात्काराच्या घटना होणे ही शरमेची बाब आहे.”, असे म्हणत अभाविपचे मुंबई महानगर सहमंत्री प्रशांत माळी यांनी आंदोलनादरम्यान तीव्र निषेध व्यक्त केला. (Sandeshkhali Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community