महिला दिनाच्या (Women’s Day 2025) निमित्ताने ठाण्यातील सहयोग मंदिर येथे संगीत महाकुंभचे (Sangeet Mahakumbh) आयोजन करण्यात आले आहे. संगीत महाकुंभ हे ठाण्यातील शास्त्रीय कलाकारांचे संमेलन आहे. ठाणे म्युझिक फोरम आणि उत्कर्ष मंडळ यांची ही प्रस्तुती आहे. ७, ८ आणि ९ मार्च या दिवशी हा सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये अनेक गायक-वादक कलाकारांबरोबरच धनश्री लेले, वासंती वर्तक, मुकुंद मराठे, विघ्नेश जोशी, यांच्या जोडीला अमृता दीक्षित, शर्वरी कुलकर्णी बोरकर, वृंदा दाभोळकर असे उत्तम युवा संवादक ही यात सहभागी झाले आहेत. शुक्रवार, ७ मार्च आणि शनिवार ८ मार्च या दिवशी संध्याकाळी ५ वाजता, तर रविवार, ९ मार्च या दिवशी सकाळी ९ वाजता हे सत्र सुरू होईल. शशांक दाबके, अनंत जोशी आणि धनश्री लेले हे या सोहळ्याचे आयोजक आहेत.
(हेही वाचा – Dhananjay Mundhe Resigns: त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती; पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया)
यंदा काय काय ऐकायला मिळणार ?
या ३ दिवसांत नूर-ए-झाकीर उस्ताद झाकीर हुसेन यांना आदरांजली, ‘सितार सिंफनी’, ‘रंग भैरवीचे’, गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘गोविंदाय नमः’ हार्मोनियम आणि ऑर्गन एकलवादन, नाट्यसंगीत, विविध राग बंदिशी, ग्वाल्हेर घराण्याचा गायनप्रकार ‘रागसागर’ आणि ९ मार्च रोजी सकाळच्या सत्रात विविध नातेसंबंध, कलाकारांचे नाते व विविध नातेदर्शक बंदिशी अशा संकल्पना यंदा रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. विविध त्रिधारा अशी संकल्पना दरवर्षी घेतली जाते.
काय आहे युनिटी संगीत संमेलन ?
१२ वर्षांपूर्वी अनंत जोशी, वेव्हज म्युझिकलचे शशांक दाबके आणि निरूपणकार धनश्री लेले यांच्या संकल्पनेतून दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या आसपास एक त्रिदिवसीय असा शास्त्रीय संगीतातील गायक वादक कलाकारांना एकत्रित आणून युनिटी संगीत संमेलन (Unity Sangeet Sammelan) आयोजित करण्यात आले. वासंती वर्तक, धनश्री लेले, मुकुंद मराठे, विघ्नेश जोशी अशा निष्णात संवादक कलाकार साथीने प्रथम वर्षी सुमारे ४० संगीतसाधक गायक, वादक यात सहभागी होते. आता ही संख्या ८० च्या आसपास पोहोचली आहे. यंदा या सोहळ्याचे १२ वे वर्ष आहे. (Women’s Day 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community