प्रशांत दामले यांच्यासह आरती अंकलीकर टिकेकर, मीना नाईक यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

रंगमंचावर बहुआयामी भूमिका साकारणारे चिरतरुण अभिनेता, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले यांना संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या ​फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी, २५ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. 2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले.

प्रशांत दामले यांनी मानले आभार 

विशेष म्हणजे प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाचे १२ हजार ५०० प्रयोग पूर्ण झाले आहेत. असा विक्रम करणारे प्रशांत दामले एकमेव कलाकार आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानंतर अभिनेते प्रशांत दामले यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रेक्षकांचे सोशल मीडियावरील पोस्टद्वारे आभार मानले. ‘आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. असच प्रेम असु दे’, या त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
तर शास्त्रीय गायनासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल आरती अंकलीकर टिकेकर यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रशांत दामले आणि आरती अंकलीकर टिकेकर या दोघांनाही 2020 सालचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका मीना नाईक  यांना 2020 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here