Sangli Accident: … आणि लेकीचा ‘तो’ वाढदिवस ठरला शेवटचा; सांगलीतील भीषण घटना

222
Sangli Accident: ... आणि लेकीचा 'तो' वाढदिवस ठरला शेवटचा; सांगलीतील भीषण घटना
Sangli Accident: ... आणि लेकीचा 'तो' वाढदिवस ठरला शेवटचा; सांगलीतील भीषण घटना

मुलीच्या वाढदिवसाहून परत येताना (Sangli Accident) कुटुंबावर काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात एकच महिला बचावली असुन तिची प्रकृतीही गंभीर आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तासगाव-मणेराजुरी मार्गावर हा भीषण अपघात झाला. चिंचणी येथे भरधाव कार कॅनॅालमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यु झाला. (Sangli Accident)

(हेही वाचा –Western Railway: डहाणू ते विरार लोकलसेवा ठप्प, ट्रॅक दुरुस्तीबाबत रेल्वे प्रशासन म्हणाले…)

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल (२८ मे) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तासगाव मणेराजुरी मार्गावरील ताकारी कॅनलमध्ये अल्टो कार कोसळली. अपघाताच्या वेळी या गाडीतून एकाच कुटुंबातील सात जण प्रवास करत होते. या घटनेमुळे (Sangli Accident) परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे सर्व नातेवाईक मुलीच्या वाढदिवसासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील एका गावात गेले होते. सोहळा आटपल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. तासगावच्या दिशेने येत असताना चिंचणी हाती येथे ताकारी कॅनलमध्ये अल्टो कार अचानक कोसळली. (Sangli Accident)

(हेही वाचा –Monsoon: येत्या ४८ तासांत मान्सून केरळात दाखल होणार! महाराष्ट्रात कधी ?)

अपघाताचं (Sangli Accident) नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास प्रवास करत असल्यामुळे चालकाला थकवा येऊन झोप अनावर झाली असावी. आणि नेमकी गाडी चालवत असतानाच डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या वृत्तामुळे ज्या मुलीच्या घरुन कुटुंब वाढदिवसाचा सोहळा साजरा करुन परत येत होतं, ते शोकसागरात बुडाले आहेत. (Sangli Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.