माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षाचे नेते संजय शिवलाल कोकाटे (Sanjay Kokate) यांनी पक्षाची साथ सोडून शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच माढा तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत (Prof. Shivaji Sawant) यांचे प्रस्थ असून, त्यांच्याशी कोकाटे (Sanjay Kokate) हे कसे जुळवून घेतात. यावर त्यांचे पुढील राजकारण अवलंबून राहणार असल्याचे बोलले जाते.
( हेही वाचा : Meerut मधील पोलीस ठाण्यात चक्क इफ्तार पार्टीचे आयोजन; पोलिस प्रभारींवर निलंबनाची कारवाई)
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यात सोलापूर जिल्ह्यात माढा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) पक्षाने महायुतीला धोबीपछाड दिली होती. त्यामुळेच सोलापुरातील चारही आमदारांमध्ये चलबिचल सुरु असल्याची चर्चा आहे. यामुळेच कोकाटे (Sanjay Kokate) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘रामराम’ करत शिवसेना (Shiv Sena) शिंदे पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोणकोण साथ सोडणार, याचीही उत्सुकता वाढली आहे.
मध्यांतरी स्वत:च्या व्यवसायामुळे अडचणीत आल्याने प्रतिमेला धक्का बसलेल्या कोकाटे (Sanjay Kokate) यांनी २०१९ सालच्या माढा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात द्वितीय क्रमांकाची ७४ हजार ३२८ मते मिळविली होती. कोकाटे (Sanjay Kokate) हे मूळचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील गटाचे. विशेषतः दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील (Pratapsinh Mohite-Patil) यांची ताकद मिळवून त्यांनी राजकारणात मोठे होण्याचा प्रयत्न केला. नंतर ते शिवसेनेत गेले अणि पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आले. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community