सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्याचा राग शिवसेना उबाठाकडून वेळोवेळी व्यक्त होतो. गुरुवारी २५ जुलैला सकाळच्या सत्रात शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला असता राऊत यांनी न्यायालयावरच ताशेरे ओढले. ‘आपली न्याययंत्रणा नादान झाली आहे,’ असे बोलत केजरीवाल तुरुंगात असण्यासाठी न्याययंत्रणेला जबाबदार धरले. (Sanjay Raut)
(हेही वाचा- पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर बचाव कार्य व्यवस्थित सुरू – CM Eknath Shinde)
तुरुंगात असायला हवे ते मंत्रिमंडळात
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना एका प्रकरणात जामीन झाला तर दुसऱ्या प्रकरणात ते अडकले जातात, यावर बोलताना राऊत म्हणाले, “नक्कीच, ज्यांना अटक करायला हवे आणि जे तुरुंगात असायला हवे अशा नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपाने त्यांना संसदेत, मंत्रिमंडळात बसवले आहे. आणि ज्यांची तुम्हाला राजकारणात भीती वाटते, त्यांना तुरुंगात टाकले, त्यांना जामीन मिळू देत नाही,” असा आरोप राऊत यांनी केला. (Sanjay Raut)
न्याययंत्रणेचा गैरवापर
केजरीवाल यांना जामीन न मिळाल्याबद्दल बोलताना राऊत पुढे म्हणाले, “केजरीवाल यांना जामीन मिळू देत नाही, हा सत्तेचा आणि न्याययंत्रणेचा गैरवापर आहे आणि आपली न्याययंत्रणासुद्धा नादान झाली आहे. त्यामुळे हे सगळे घडते आहे,” असा टोला न्यायव्यवस्थेला लगावला. यापूर्वीही अनेकदा राऊत यांनी न्याययंत्रणेवर टीका केली आहे. गुरुवारी त्यांनी न्यायव्यवस्थेवरील राग पुन्हा एकदा व्यक्त केला. (Sanjay Raut)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community