महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या (Legislative Council) ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी विधानभवनात मतदान सुरु पूर्ण झाले. दरम्यान, विधानसभा परिसरात उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट झाली. भेटी दरम्यान, संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात झालेल्या संवादामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, दरम्यान या संदर्भात राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. (Sanjay Raut)
(हेही वाचा – झारखंडमध्ये MLA Hafizul Hasan यांनी कुराणातील आयते म्हणत घेतली मंत्रीपदाची शपथ)
विधानभवन परिसरात संजय राऊत आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट झाली. यावेळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चंद्रकांत पाटील दिसताच संजय राऊत त्यांच्या दिशेने गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करत म्हणाले – अरे व्वा, मग आपण तर परत एकत्र आले पाहिजे. त्यावर पाटील म्हणाले की, तुमचे हे वाक्य असेल तर मी सुद्धा लाईन घेणार. त्यानंतर राऊत यांनी तत्काळ मी तर नेहमीच लाइन देत असतो, असे मिश्किल विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकच हसा पिकला. (Sanjay Raut)
(हेही वाचा –महिलांना मासिक धर्माच्या वेळेस भर पगारी रजा द्या; Atmasmanman Manch च्या अभियानास सुरुवात )
आमचे काही वैयक्तिक भांडण आहे का?
संजय राऊत व चंद्रकांत पाटील यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उबाठा गटाचे खासदार स्वतः संजय राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील आमचे जुने मित्र आहेत. दिल्लीत आम्ही पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) भेटतो. अमित शाहा (Amit Shah) ही आम्हाला भेटतात. तर चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. तसेच चंद्रकांत पाटील आणि आमचे काही वैयक्तिक भांडण आहे का? हे भांडण राजकीयदेखील नाही. आमचे भांडण वैचारिक आहे आणि ते तसेच राहील, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनीही चॉकलेट देत उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होती. त्याची खूप चर्चा झाली होती. (Sanjay Raut)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community