Sanjay Raut यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा; काय आहे प्रकरण ?

628
Sanjay Raut यांचे त-त-प-प झाले!

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांची पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी उबाठा गटाचे प्रवक्ते, तसेच खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात माझगाव सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. संजय राऊत यांनी सोमय्या दांपत्याने शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. हा घोटाळा 100 कोटींचा असून या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप केला होता. संजय राऊतांना (Sanjay Raut) 15 दिवसांच्या तुरुंगवासाबरोबरच 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत राऊत यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

(हेही वाचा – Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्या खेळाडूंना ३.२ कोटी रुपयांचं बक्षीस)

मेधा किरीट सोमय्या यांची याचिका

मानहानी प्रकरणामध्ये न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवले आहे. सत्र न्यायालयात किरीट सोमय्यांची पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी एक याचिका दाखल करत राऊतांवर मानहानीचा दावा केला होता. “मी कोर्टाच्या निकालावर समाधानी आहे,” अशी प्रतिक्रिया या निकालानंतर मेधा सोमय्या यांनी नोंदवली आहे.

काय आहे प्रकरण ?

मीरा भाईंदर शहरामध्ये एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते.. त्यातील 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतली, असा आरोप राऊत यांनी 2022 साली एप्रिल महिन्यामध्ये केला होता. हा सर्व घोटाळा 100 कोटींचा असल्याचाही त्यांचा दावा होता.

संजय राऊत म्हणाले होते, “ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पाहा. विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत. किरीट सोमय्या आणि त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले, याची माहिती बाहेर येईल,” असा दावा राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर लावलेले हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे मेधा सोमय्या यांनी सांगितले होते. त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता. याच प्रकरणात आता राऊतांविरोधात निकाल लागला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.