Sanjay Shirsat: ‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला, तो पागल माणूस…’ ‘त्या’ आरोपांवर शिरसाटांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर 

164
Sanjay Shirsat: ‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला, तो पागल माणूस…’ ‘त्या’ आरोपांवर शिरसाटांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर 
Sanjay Shirsat: ‘संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला, तो पागल माणूस…’ ‘त्या’ आरोपांवर शिरसाटांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर 

विधान परिषदेची (Legislative Council) निकाल शुक्रवारी (१२ जुलै) रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आले.  यावेळी विधानपरिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान महायुतीने ९ तर महाविकास आघाडीने ३ उमेदवार दिले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra MLC Election Result 2024) गुप्त पद्धतीने मतदान झाले. दरम्यान, विधान परिषदेचे सभासद होण्यासाठी काही लोकांनी एक सदस्य विकत घेण्यासाठी २५ कोटी रुपये दिलेत, असा गंभीर आरोप उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शिवसेनाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट  (Sanjay Shirsat) यांनी देखील प्रत्युत्तर देत राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. (Sanjay Shirsat)

(हेही वाचा – Anganwadi Nutrition: पंढरपुरातील घटना! अंगणवाडीतील खिचडीत आढळले मृत बेडकाचे पिल्लू )

काय म्हणाले संजय शिरसाट?

संजय राऊत हा व्यक्ती पागल झालेला आहे. त्यांच्या विधानाला तुम्ही एवढे महत्त्व देण्याची मुळीच गरज नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असल्याने ते असे बेछूट आरोप करत आहेत. मुळात विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी कोणी २५-२५ कोटी रुपये कोणी देईल का, असे जर झाले असते तर सदस्य होण्यासाठी एकाद्या आमदाराला सुमारे २०० ते ३०० कोटी रुपये खर्च करावे लागेल, मग कोणी कशाला विधानपरिषदेचे सदस्य होणार आहे. (Sanjay Shirsat)

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, मुळात महायुतीच्या नेत्यांनी अन्य पक्षातील लोकांनी ठेवलेले संबंध, वैयक्तिक रिलेशनमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले आहे, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. (Sanjay Shirsat)

(हेही वाचा – Borivali : बाभई स्मशानभूमी येत्या १५ जुलैच्या आत सुरु न झाल्यास…)

विधानपरिषद विजयी उमेदवार 

या विधानपरिषद निकालामध्ये (Legislative Council Results) महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजपाचे ४, शिवसेनेचे २ आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे २ उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आले. तर भाजपाच्या पाठिंब्याचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी दुसऱ्या पसंतीची अधिक मते घेऊन विजय मिळवला. (Sanjay Shirsat)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.