मुसलमान एकटा असतो तेव्हा सेक्युलर असतो आणि गर्दीत असतो तेव्हा कट्टर होतो! – संजय उपाध्ये

162
सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वात साम्य आहे. अन्यथा १९९२मध्ये शिवसेना नसती, तर आज मुंबईचे काय झाले असते. गजानन कीर्तिकर आता योग्य जागी आले आहेत. सावरकर नेहमी सांगायचे कि हिंसा विनाकारण होत असेल, तर तिला हिंसा म्हणायचे, पण त्याला प्रतिकार करताना जी हिंसा होते त्याला वीर सावरकर अहिंसा म्हणायचे. मुसलमान एकटा असतो, तेव्हा सेक्युलर असतो आणि गर्दीत येतो तेव्हा संघटित होतो आणि हिंदू एकटा असतो तेव्हा कट्टर होतो आणि गर्दीत येतो तेव्हा सेक्युलर असतो, असे सावरकर या विषयावर पीएचडी केलेले, साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील सावरकर सभागृहात ‘वारसा विचारांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, नेते रामदास कदम, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते राहुल शेवाळे, भाजप नेते प्रसाद लाड, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर आदी उपस्थित होते.

एका कार्यक्रमात मी मराठी भाषेवर कविता सादर केली, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ती कविता आवडली, त्यावेळी त्यांनी मला मातोश्री बंगल्यावर बोलावले. बंगल्यावर गेलो आणि दोन तास शिवसेनाप्रमुखांना कविता ऐकवली. त्यांच्यासोबत मैत्रीचा क्षण अनुभवला, त्यानंतर स्वतःहून मी बाळासाहेबांना वारंवार भेटायला जायचो, हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होऊ लागली. दसरा मेळाव्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यासपीठावर आपल्याला एक लाख शिवसैनिकांच्या समोर कविता सादर करायला लावली. भारतात शिवसेना एकमेव पक्ष आहे, जो कलावंतांनी स्थापन केला आहे. त्यांनी माझे कौतुक केले, असा नेता होणे नाही, असे  डॉ. संजय उपाध्ये  म्हणाले.

मुसलमान बदलत नाही 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संगतीत हिंदुत्व मला कळत गेले. आनंद दिघे यांचीही एका कार्यक्रमात भेट झाली, तेव्हा त्यांनीही मला ठाण्यात बोलावले होते, त्यांनी दिलेली शाल माझ्या अंगावर घातली. शिवसेनेत प्रवेश करण्याची वेळ आली होती, पण निमंत्रण आले नव्हते, आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलत आहे. बदल काळानुसार व्हायला पाहिजे, हे हिंदू धर्मात झालेल्या अवतारांनीही दाखवून दिले आहे. परमेश्वराने त्याचा वेश आणि आवेश बदलला होता. मुसलमान मात्र बदलत नाहीत सर्वसामान्य मुसलमान हिंदू देवतांचे चित्र टॅक्सीच्या डॅशबोर्डवर पाहिल्यावर तो त्या टॅक्सीत बसत नाही, हिंदू तसे करत नाही. या मातीसाठी कर्तृत्व करून दाखवल्यावर कुणाला डोक्यावर घेतले जात नाही, असे होत नाही. हिंदू असहिष्णू आहेत म्हणतात, मग आफताबच्या प्रकरणात कुणी का बोलत नाही? कुठे गेल्या शबाना आझमी?  हिंदू धर्म एकच धर्म आहे, ज्याचा संस्थापक नाही, असेही संजय उपाध्ये म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.