One act competition : संस्कार भारतीतर्फे राष्ट्रीय प्रश्नांवर एकांकिका स्पर्धेचे आयोजन

129
One act competition : संस्कार भारतीतर्फे राष्ट्रीय प्रश्नांवर एकांकिका स्पर्धेचे आयोजन
One act competition : संस्कार भारतीतर्फे राष्ट्रीय प्रश्नांवर एकांकिका स्पर्धेचे आयोजन

संस्कार भारती कोंकण प्रांप्त आणि राष्ट्रीय कला मंचातर्फे एकांकिका स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रीय भावना असलेल्या विषयांवर एकांकिका सादर करायच्या आहेत. (One act competition) नाटक हे जनसंवादाचा सशक्त माध्यम म्हणून पूर्वापार प्रचलित आहे. ज्यात संपूर्ण रस आणि भाव यांचा सहज संगम पाहायला मिळतो. हे लक्षात घेऊन संस्कार भारती कोकण प्रांत आणि राष्ट्रीय कला मंच या एकांकिका स्पर्धेचं आयोजन करत आहे.

संस्कार भारतीचे घोषवाक्य आहे ‘सा कला या विमुक्तये’ अर्थात कला, म्हणजे मानवाचा सर्व दुःखांपासून मुक्त होण्याचा मार्ग. २० ते २१ ऑक्टोबर पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील ज्युनियर महाविद्यालये सहभागी होऊ शकतात. नाटक मराठी किंवा हिंदी भाषेत करू शकता. संबंधित महाविद्यालयातील नाट्यकला विभागाला विनंती आहे की, त्यांनी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर नमूद केलेल्या कालावधीत आपल्या नाट्यसंहिता जमा कराव्यात.

(हेही वाचा – I.N.D.I.A. Alliance : जागावाटप करताना इंडिया आघाडीला करावी लागणार तारेवरची कसरत)

या सादरीकरणासाठी विषय पुढील प्रमाणे आहेत. १. आपल्या देशाच्या देशाचे संस्कार, रीती-रीवाज आणि परंपरा यांना अधोरेखित करणारे मुद्दे या विषयांतर्गत येतील. २. पर्यावरण समस्या – जल, भू आणि वायू प्रदूषणामुळे होणारे नुकसान, ग्लोबल वॉर्मिंग, संपत चाललेली जैवविविधता, जल संकट ,भू रक्षण आधी संकटे. ३.समाज रचना आणि सामाजिक समरसता – सामाजिक एकता आदी. ४. कुटुंब व्यवस्था – न्यूक्लिअर फॅमिली, वृद्धांच्या समस्या, जनरेशन गॅप, ऑनलाइन गेमिंगचे दुष्परिणाम, परिवार आणि संस्कृतीवर सोशल मीडियाचा साईड इफेक्ट. ५. नागरिक कर्तव्य – देशाचे नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाचे देशाच्या प्रति काही कर्तव्य आहेत. प्रत्येक नागरिक याबद्दल जागरूक राहिला तर देशातील आतंकवादासारखे प्रश्न आपोआप संपून जातील. समाजाला मजबूत बनवण्यासाठी सामान्य नागरिक काय करू शकतो? राष्ट्रभक्ती, राष्ट्र शक्तीचे विषय यात समाविष्ट होतील. ६. शिव राज्याभिषेक:- शिव राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शिवाजी महाराज यांच्या विविध पैलू उलगडणारे विषय स्पर्धेत असावेत. (One act competition)

स्पर्धेचे नियम, पुरस्कार आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी तसेच कुठल्याही प्रकारच्या शंका, अडचणी असल्यास ८८७९७४३२३२ व ९८९२०९६२५६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (One act competition)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.