Sanskrit In Madrasa : ‘या’ राज्यातील मदरशांत मिळणार संस्कृतचे धडे

140
Sanskrit In Madrasa : 'या' राज्यातील मदरशांत मिळणार संस्कृतचे धडे
Sanskrit In Madrasa : 'या' राज्यातील मदरशांत मिळणार संस्कृतचे धडे

उत्तराखंडमधील मदरशांमध्ये आता संस्कृत शिकवले जाणार आहे. (Sanskrit In Madrasa) कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात डेहराडून, हरिद्वार, उधमसिंह नगर आणि नैनिताल जिल्ह्यातील ४ मदरशांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला आहे. मदरसा वेल्फेअर सोसायटीने ६ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मदरशांच्या अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश करण्याचे आवाहन केले होते, मात्र मदरशांमध्ये संस्कृत शिकवण्यास नकार देण्यात आला होता. मात्र आता त्या दिशेने पावले टाकण्यात आली आहेत. वैज्ञानिक आणि इस्लामिक शिक्षणाची सांगड घालून शिक्षणपद्धतीचे आधुनिकीकरण करण्याचा उत्तराखंड वक्फ बोर्डाचा उपक्रम आहे.

(हेही वाचा – Cases Against Corrupt Officer : भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना अटकेपासून संरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी याविषयी सांगितले की, ”उत्तराखंड मदरसा बोर्डाच्या अंतर्गत मदरशांमध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू केला जाईल. त्याअंतर्गत संस्कृत भाषा शिकवली जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांचीही नियमित नियुक्ती करण्यात येणार आहे. रझिया सुलताना या मुसलमान मुलीने संस्कृतमध्ये पीएचडी केली आहे. रझिया कुराणचे संस्कृतमध्ये भाषांतर करत आहे. वक्फ बोर्डाच्या राज्यस्तरीय शिक्षण समितीमध्ये रझियाचा सदस्य म्हणून समावेश केला जाईल. संस्कृतकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.” (Sanskrit In Madrasa)

यावेळी मोहम्मद आरिफ, खालिद मन्सूरी, पूजा रावत, उस्मान मुफ्ती, अहसान कारी, इरफान कारी, शहजाद दिलशाद, मौलवी रिहान, कारी अब्दुल खालिद आदी उपस्थित होते.

मुलांसाठी वक्फ बोर्ड ड्रेस कोडही ठरवणार

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स म्हणाले की, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात डेहराडून, हरिद्वार, उधम सिंह नगर आणि नैनिताल जिल्ह्यांतील 4 मदरशांमध्ये करण्यात आलेल्या शिक्षणाचे आधुनिकीकरण पाहता सुमारे 40-50 मदरशांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांचेही आधुनिकीकरण केले जाण्याची मागणी केली आहे. या आधुनिक मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी वक्फ बोर्ड ड्रेस कोडही ठरवणार आहे.

इथे संस्कृत शिकवली नाही तर कुठे शिकवणार

‘सध्या 117 मदरशांमध्येही संस्कृतचे शिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासाबरोबरच स्मार्ट क्लासेसचे आयोजन केले जात आहे. उत्तराखंड ही देवभूमी आहे, इथे संस्कृत शिकवली नाही तर कुठे शिकवणार. आता मुस्लिम समाजातील लोकांनाही बदल हवा आहे. मदरशांच्या आधुनिकीकीकरणामुळे तेही खूश आहेत’, असे शादाब शम्स म्हणाले. (Sanskrit In Madrasa)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.