मलेशियात (Malaysia) भक्तीमय वातावरणात संत नामदेव महाराज समाधी महोत्सव साजरा झाला. भक्तिपथ फाउंडेशन आयोजित विश्वभ्रमण दिंडीद्वारे तब्बल 52 वारकऱ्यांसह या वर्षी हिंगोली, नरसी गावातून संत नामदेव महाराज यांच्या चरण पादुका, ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदी येथे दर्शन घेत थेट मलेशिया, सॅलँगोर येथे कार्तिक स्वामी मंदिरात (Batu Caves) नेण्यात आल्या. तेथून ही दिंडी कार्तिक स्वामी मंदिर ते श्री महा मारिअम्मान मंदिर मलेशिया, क्वालांलम्पूर येथे नेण्यात आली.
(हेही वाचा बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CM Eknath Shinde यांच्याकडून उपाययोजना)
जगभरात आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सुरु झालेली ही दिंडी वाटेत संत नामदेव महाराजांचे चरित्र आणि ज्ञानेश्वरी यांचे वितरण करत मंदिरात पोहोचली. यावेळी अप्रतिम अशा अभंग आणि भजनांनी मंदिराचा परिसर विठ्ठलमय झाला. जिथे मलेशियात (Malaysia) राहत असणाऱ्या महाराष्ट्रीयन भाविकांनी हजेरी लावली. येथे महाराष्ट्र मंडळ मलेशिया (क्वालांलम्पूर, सॅलँगोर) यांच्या आग्रहाचा सन्मान करत अत्यंत आनंदात ही दिंडी दुसऱ्या दिवशी ब्रिकफिएल्डस, क्वालांलम्पूर (लिटील इंडिया) येथे नेण्यात आली, जिथे पादुकांचे आणि वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. मलेशियायतील भाविकांना पादुकांच्या दर्शनाचा आणि अभंग व भजनाचा आनंद सहज घेता आला. येथे येणाऱ्या भाविकांनी स्वच्छेने प्रसाद आणि दक्षिणेचा आग्रह धरत अखंड हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांना आठवण म्हणून भेटवस्तू देत आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. महाराष्ट्र मंडळ हे भक्तिपथ फाउंडेशनचे शतशः आभारी राहील. त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत त्यांनी पादुकांचे दर्शन भाविकांना उपलब्ध करून दिले. महाराष्ट्र मंडळाने एका रात्रीत ह्या अविस्मरणीय उत्सवाची तयारी करत मलेशियातील (Malaysia) महाराष्ट्रीयन लोकांची मने जिंकली. जिथे त्यांची मेहनत वाखाणण्याजोगी होती.
Join Our WhatsApp Community