जागतिक कीर्तीचे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिका (BMC) आणि संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, आर्थिक विकास क्षेत्रात तसेच चर्मकारांच्या उन्नतीकरिता काम करत असलेल्या १० व्यक्तींचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार-२०२४’ (Sant Rohidas Samaj Bhushan Award 2024) साठी पात्र व्यक्तीकडून २१ फेब्रुवारी २०२४ पूर्वी अर्ज मागविण्यात येत आहेत. (Sant Rohidas Samaj Bhushan Award 2024)
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची यंदा ६४७वी जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने मुंबई महानगरपालिका (BMC) व संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित सोहळ्यात ‘संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार-२०२४’ (Sant Rohidas Samaj Bhushan Award 2024) साठी निवड झालेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. चर्मकार समाजातील व्यक्ती या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. शिवाय, समितीने पुरस्कारासाठी निश्चित केलेल्या अन्य निकषांचीही अर्जदाराने पूर्तता करणे आवश्यक आहे. (Sant Rohidas Samaj Bhushan Award 2024)
येथे जमा करा अर्ज
अर्जासोबत दोन छायाचित्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अन्य ओळखपत्र, संबंधीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा अहवाल, कोणताही गुन्हा दाखल नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, दोन नोंदणीकृत संघटनांचे शिफारस पत्र, संघटना नोंदणी अर्ज जोडणे आवश्यक आहे. संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजेपूर्वी मा. उप आयुक्त (परिमंडळ २), तिसरा मजला, एफ (दक्षिण) विभाग कार्यालय, किर्तीमहल हॉटेल, जगन्नाथ भातणकर मार्ग, परळ, मुंबई- ४०००१२ यांच्याकडे सुपूर्द करावा लागेल. (Sant Rohidas Samaj Bhushan Award 2024)
संत रोहिदास समाज भूषण पुरस्कारासंबंधी अधिक माहितीसाठी संत शिरोमणी रोहिदास समन्वय समितीचे अध्यक्ष सुर्यकांत आंबेकर (भ्र. क्र. ७०२१८९९४६२), सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे (भ्र. क्र. ९८२०१५८८८५), उपाध्यक्ष राजेश खाडे (भ्र. क्र ९८२१६५५५७८), खजिनदार जगन्नाथ वाघमारे (भ्र. क्र ९८२००३४३६८), सुभाष आंबोकर (भ्र. क्र ९०२९१५८९८९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संत शिरोमणी रोहिदास समन्वय समितीचे सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे यांनी केले आहे. (Sant Rohidas Samaj Bhushan Award 2024)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=o68Gl2NSAZU
Join Our WhatsApp Community