भारत हा विविध संस्कृती आणि वैविध्यपूर्ण सणांसाठी ओळखला जातो. प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात. असाच एक वैशिष्ट्यपूर्ण सण गोव्यात साजरा केला जातो, या सणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लांबून येतात. ‘साओ जोआओ’ हा गोव्याचा मुख्य कॅथोलिक सण म्हणून ओळखला जातो. चला तर जाणून घेऊयात या ‘साओ जोआओ’ सणाबद्दल.
काय आहे ‘साओ जोआओ’ सण?
गोव्यात दरवर्षी २४ जून रोजी हा सण साजरा केला जातो. ‘साओ जोआओ’ ला ‘सॅन जुआन’ म्हणून देखील ओळखले जाते. हा वार्षिक कॅथोलिक उत्सव आहे. या दिवशी गोवन लोक फुले, पाने आणि फळांपासून बनवलेले मुकुट परिधान करतात. सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सण साजरा केला जातो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हा सण विहिरी, तलाव आणि नद्यांमध्ये चक्क उडी मारून साजरा केला जातो. हा सण इतका लोकप्रिय झाला आहे की गोवा पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांसाठी पूल पार्टी आणि खाजगी ‘साओ जोओस’ देखील आयोजित करते.
नवविवाहित पुरुषांना विशेष महत्त्व
या सणात इतरही अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम होतात. नवविवाहितांसाठी हा सण खास असतो. या सणाची खासयीत म्हणजे, नवविवाहित पुरुषांनी विहिरीत स्नान केल्यास त्यांचे कौटुंबिक जीवन सुखकर होते, असे मानले जाते. गोवन लोक या सणाचा पुरेपूर आनंद लुटत लोकनृत्य आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात. तसेच या सणात लोक तलाव आणि विहिरींमध्ये लपवलेल्या आकर्षक भेटवस्तू शोधतात.
(हेही वाचा IMD Alert : राज्यात ‘या’ ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा)
Join Our WhatsApp Community