सप्तश्रृंगी बस अपघात : मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख तर जखमींवर शासकीय खर्चाने होणार उपचार

171
सप्तश्रृंगी बस अपघात : मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख तर जखमींवर शासकीय खर्चाने होणार उपचार

नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. तर या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज (बुधवार, १२ जुलै) सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

(हेही वाचा –  नाशिक : सप्तश्रृंगी गड घाटात बसचा अपघात; एकाचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी)

अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल (११ जुलै) सकाळी ८:३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. मात्र नंतर या बसचा अपघात झाला. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.