आता ‘पठाण’च्या समर्थनार्थ ‘सर तन से जुदा’च्या घोषणा

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या विरोधातून सुरू झालेल्या वादाला मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी धार्मिक वळण मिळाले आहे. इंदूर, महू आणि देवासमध्ये ‘सर तन से जुदा’चे नारे लावण्यात आले. याचे काही व्हिडिओही समोर आले आहेत.

लहान मुलांकडूनही घोषणा 

एका हिंदी वृत्त संकेतस्थळाने दिलेला वृत्तानुसार, इंदूरमधील बारवाली चौकी येथे ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. यामध्ये लहान मुलांचाही सहभाग होता. खजराना येथेही मुस्लिम समाजाच्या लोकांनी रास्ता रोको केला. कथितरित्या हातात रक्षासूत्र आणि कपाळा टिळा लावलेल्या लोकांना मारहाण करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेचे (VHP) राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी बुधवारी, 25 जानेवारी 2023 रोजी ट्विटरवर दोन व्हिडिओ शेअर केले. दोन्ही व्हिडिओंमध्ये अनेक लोक ‘सर तन से जुदा’चे घोषणा देताना दिसत आहेत. दोन्ही व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहेत.

(हेही वाचा union budget 2023 : अर्थसंकल्प तयार करणा-या अधिकाऱ्यांवर गुप्तचर खात्याची नजर; काय आहे भानगड?)

मध्य प्रदेशात ‘सर तन से जुदा’ ची टोळी 

पहिला व्हिडिओ बडवली चौकीचा असून, दुसरा व्हिडिओ खजराना पोलिस ठाण्याच्या बाहेरचा आहे. दोन्ही व्हिडिओंमध्ये लहान मुलेही दिसत आहेत. हे लोक ‘गुस्ताख-ए-रसूल की वही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’ आणि ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा देताना ऐकू येतात. विनोद बन्सल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना टॅग केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “देशातील सर्वात स्वच्छ शहरातही जिहादी कचऱ्याचा ढीग आहे… कदाचित शिवराज सिंह किंवा नरोत्तम मिश्रा जी यांना माहित नसेल की त्यांच्या इंदूरमध्येही ‘सर तन से जुदा’ ची टोळी सक्रिय झाली आहे. या सापांच्या फणा आजच ठेचून काढणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here