Supreme Court : देशातील पहिल्या मूकबधीर वकील सारा सनी; सर्वोच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

141
Supreme Court : देशातील पहिल्या मूकबधीर वकील सारा सनी; सर्वोच्च न्यायालयाने घेतला 'हा' मोठा निर्णय  
Supreme Court : देशातील पहिल्या मूकबधीर वकील सारा सनी; सर्वोच्च न्यायालयाने घेतला 'हा' मोठा निर्णय  

सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात प्रथमच एक मूकबधिर वकील सुप्रीम कोर्टात रुजू झाल्या आहेत. (Supreme Court) त्यांच्या पहिल्या सुनाववाणीत त्यांनी दुभाष्याच्या मदतीने युक्तिवाद केला. सरन्यायाधीशांनी या महिला वकिलांना दुभाष्याच्या मदतीने युक्तिवाद करण्यास परवानगी दिली होती. सुप्रीम कोर्टातील मूकबधिर वकील सारा सनी यांनी सांकेतिक भाषेतून कोर्टाला आपला मुद्दा समजावून सांगितला.  यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मूकबधिर वकील सारा सनी यांच्यासाठी दुभाष्याची नियुक्ती केली आहे. (Supreme Court)

(हेही वाचा – D. Y. Chandrachud : २० वर्षांत महिला न्यायाधीशांची संख्या वाढेल, सरन्यायाधीशांनी दिली आनंदाची बातमी)

याविषयी सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायालयाने नियुक्त केलेला दुभाषी सुनावणीला हजर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भविष्यात घटनापीठाच्या प्रत्येक सुनावणीत दुभाष्याची तरतूद असावी, जेणेकरून कर्णबधिरांनाही त्यांच्या संकेतांद्वारे न्यायालयीन सुनावणी समजू शकेल, यावर सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. (Supreme Court)

वकील सारा यांनी न्यायालयाकडे केली मागणी 

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी दुभाष्याची नियुक्ती करण्याची मागणी करणारी याचिका सारा यांनी न्यायालयात दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने स्वखर्चाने दुभाषी नेमण्याचा निर्णय घेतला. आज सारा बेंगळुरूहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सामील झाल्या होत्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत दुभाष्याचाही सहभाग होता. तो सारा यांना सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या उलटतपासणीबाबत सांकेतिक भाषेत सांगत होता.

घटनापीठाच्या सुनावणीत दुभाषी असतील

या उपक्रमाचा अधिक विस्तार करण्याचा विचार न्यायालय करत असल्याचे संकेत सरन्यायाधीशांनी दिले आहेत. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले की, न्यायालयाने नियुक्त केलेला दुभाषी सुनावणीला हजर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी महासचिवांशी चर्चा करत होतो की घटनापीठाच्या सुनावणीत दुभाष्यांची व्यवस्था करावी जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सर्वांना समजेल.

याविषयीची सुनावणी झाल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सारा सनी यांना विचारले की, ‘तुम्ही दुभाष्याद्वारे सुनावणी योग्य प्रकारे समजून घेऊ शकलात का ?’ या वेळी सारा सनी यांनी दुभाष्याद्वारे उत्तर दिले की, त्यांच्यासाठी हा खरोखर चांगला अनुभव होता. या वेळी वकील सारा यांनी केलेल्या मंद हास्याने त्यांच्या विधानाला पुष्टी दिली. सरन्यायाधीशांनी सारा यांना सांगितले की, आता आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आता सारा यांनी त्यांच्या याचिकांमध्ये स्वतः उलटतपासणी करणे चांगले होईल. (Supreme Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.