एअर इंडियाच्या फ्लाईट कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. एअर इंडिया येत्या काही महिन्यांपासून क्रू मेंबर्सच्या (Air India Crew Dress) गणवेशामध्ये बदल होणार आहे. एअर इंडियाच्या फ्लाइट अटेंडन्ट साडीऐवजी वेगळ्या गणवेशात दिसतील. केबिन क्रूचा नवीन युनिफॉर्मदेखील पारंपरिक असणार आहे.
मागील सहा दशकांपासून क्रू मेंबर्स साड्या नेसत आहेत. एअर इंडियाच्या फ्लाईट अटेंडट्स गेल्या सहा दशकांपासून सहा वारी साड्या नेसून प्रवाशांच्या सेवेत असतात, पण आता काळाप्रमाणे आधुनिक पोषाखाकडे वळलं पाहिजे, असं अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नोव्हेंबरपर्यंत एअर इंडिया नवीन गणवेश लागू करणार असून या वर्षअखेर पोषाखाबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – Ajit Doval : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना फोन; मागितले पुरावे)
एअर इंडियाच्या डिझायनर मनीष मल्होत्रा क्रू मेंबर्सचा नवीन गणवेश डिझाईन करत आहेत. त्यांनी सांगितले की, महिलांसाठी चुडीदारसारखा पोषाख, तर पुरुषांसाठी सूट असण्याची शक्यता आहे. नवीन गणवेशामध्ये अजूनही पारंपरिक पर्यायांचा समावेश आहे. याविषयी एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की, क्रू मेंबर्ससाठी साड्या पूर्णपणे बंद केल्या जाणार नाहीत. विविध पर्याय कायम ठेवले जातील. एअर इंडिया कंपनीला पर्याय देण्यात आले आहेत. या पर्यायांमध्ये साडीसारख्या दिसणाऱ्या, पण पारंपरिक रेडी टू वेअर साड्यांचाही पर्याय देण्यात आला आहे , अशा अनेक पर्यायांमधून गणवेशाची निवड करण्यात येणार आहे.
हेही पहा –