Saree Walkathon : मुंबईत होणार साडी वॉकथॉन; केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी केला ई-नोंदणी पोर्टलचा शुभारंभ

Mumbai सूरत इथे साडी वॉकाथॉनला मिळालेल्या यशानंतर, भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर, देशातील सर्वांत मोठी साडी वॉकथॉन आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे.

171
Saree Walkathon : मुंबईत होणार साडी वॉकथॉन; केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी केला ई-नोंदणी पोर्टलचा शुभारंभ
Saree Walkathon : मुंबईत होणार साडी वॉकथॉन; केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांनी केला ई-नोंदणी पोर्टलचा शुभारंभ

भारताच्या हातमाग संस्कृतीला (Handloom culture) प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, विविध राज्यांच्या महिलांना आमंत्रित करून त्यांची साडी परिधान करण्याची पद्धत प्रदर्शित करून त्या माध्यमातून भारताची ‘विविधतेमध्ये एकता’ असलेला देश म्हणून ओळख अधोरेखित करण्यासाठी, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश (Darshana Jardosh) यांनी आज नवी दिल्ली येथे ‘साडी वॉकथॉनच्या’ ई-नोंदणी पोर्टलचा शुभारंभ केला. (Saree Walkathon) मुंबईत 10 डिसेंबर 2023 रोजी एमएमआरडीए (MMRDA) मैदानावर साडी वॉकथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – MNS : दुकानांवर मराठी पाट्या; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उरले ४ दिवस; मनसेने करून दिली आठवण)

ओटीपीच्या मदतीने नोंदणी

साडी वॉकथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी या वेबसाईटवर ओटीपीच्या मदतीने नोंदणी करता येईल. पोर्टलवर जरदोश यांनी सर्वप्रथम आपले नाव नोंदवले. सूरत (Surat) इथे पहिल्या साडी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक वस्त्र वापराला चालना देण्यासाठी आणि व्होकल फॉर लोकल (Vocal for Local) च्या संकल्पनेला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने विविध पद्धतीने साड्या नेसलेल्या 15,000 पेक्षा जास्त महिलांनी या आरोग्यदायक वॉकथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता.

सूरत इथे साडी वॉकाथॉनला मिळालेल्या यशानंतर, भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर, देशातील सर्वांत मोठी साडी वॉकथॉन आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे.

(हेही वाचा – Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्तपदी संदीप कर्णिक)

देशभरातील महिला होणार सहभागी

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला असून, महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट आहे. देशभरातील महिला आपल्या पारंपारिक पद्धतीने साडी परिधान करून या वॉकथॉन मध्ये सहभागी होणार आहेत. (Saree Walkathon)

विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय व्यक्ती येणार

सांस्कृतिक विविधता आणि सक्षमीकरणाचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात देशभरातल्या अंदाजे 10,000 महिला त्यांच्या विशिष्ट पारंपारिक साड्यांमध्ये सजून सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या दिमाखदार सोहळ्यात केवळ उत्साही महिलाच नव्हे, तर सेलिब्रिटी, प्रभावशाली व्यक्ती, फॅशन डिझायनर आणि अंगणवाडी सेविका, यासारख्या विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय व्यक्ती देखील सहभागी होतील. (Saree Walkathon)

(हेही वाचा – Bridal Eye Makeup : ब्राइडल आय मेकअप करण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण आणि सोप्या टिप्स)

अन्य उपक्रमांचे आयोजन 
29 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2023:
प्रदर्शन आणि विक्री – “गांधी शिल्प बाजार – राष्ट्रीय” हस्तकला आणि हातमाग उत्पादनांच्या 250 स्टॉलसह विविध प्रकारच्या साड्यांचे 75 स्टॉल्स.

हातमाग आणि हस्तकला प्रात्यक्षिक कार्यक्रम

साडी वॉकथॉन (10 डिसेंबर 2023)
अंतर – अंदाजे. 2 कि.मी
वेळ- सकाळी 8:00
कार्यशाळा (10 आणि 11 डिसेंबर 2023): साडी नेसण्याची पद्धत, प्रसार आणि शाश्वतता, नैसर्गिक रंग ई. (Saree Walkathon)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.