ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) आलिशान खोलीत महिनोन् महिने कैदी उपचार घेतात. यातील बरेचसे कैदी तरुण आहेत. या कैद्यांना अजून किती दिवस रुग्णालयात ठेवावे. नेमक्या कोणत्या आजारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले आहे, यावर आता पुढिल दोन दिवसांत निर्णय होणार आहे. काही दिवसांपूर्वीच ड्रगमाफिया ललित पाटील रुग्णालयातून पोलिसांना चकवा देऊन फरार झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता रुग्णायात आश्रय घेण्याऱ्या कैद्यांना परत कारागृहात पाठवले जाणार आहे. याविषयीचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेणार आहेत, अशी माहिती ससून रुग्णालयाकडू देण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे या कैद्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता आहे का, याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने त्रिस्तरीय समिती नेमली होती. याविषयी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
उपचाराच्या नावाखाली तुरुंगात आश्रय घेतलेल्या कैद्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. याकरिता रुग्णालयात दाखल झालेल्या सात कैद्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात आला. रुग्णाला कारागृहात परत पाठवण्याबाबत सर्वस्वी निर्णय हा त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेणार आहेत, अशी माहिती समितीने दिली आहे.
रुग्णालयाच्या कैदी समितीचे निर्णय
– एखाद्या रुग्णवरील उपचार पूर्ण झाले असतील, तर त्यांना तातडीने रुग्णालयातून सोडा.
– कोणत्या रोगनिदान तपासण्या राहिल्या असतील, तर त्या तातडीने पूर्ण करून घ्या.
– रुग्ण तपासण्यांना परवानगी देत नसेल, तर तसा अहवाल प्रशासनाला कळवा. रुग्णाला कारागृहात पाठवण्याची प्रक्रिया वेगाने करावी, असे निर्णय रुग्णालयाच्या कैदी समितीकडून घेण्यात आले आहेत.
कैदी समितीकडून (prisoner committee) आठवड्यातून नियमितपणे कैद्याच्या प्रकृतीचा आढावा
काही रुग्णांना ‘एमआरआय’सारख्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला आहे, मात्र संबंधित कैदी त्यास नकार देत आहेत. यामुळे रोगनिदान लवकर होत नाही. रुग्णाला परत कारागृहात पाठवता येत नाही. अशा रुग्णांचा अहवाल कारागृह प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे. कैदी समितीकडून आठवड्यातून नियमितपणे कैद्याच्या प्रकृतीचा आढावा घेईल. त्यात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मत जाणून घेतले जाईल. आवश्यकता असेल तरच कैद्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करू. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, कैदी समिती, पथकप्रमुख आणि विभागप्रमुख या सर्वांना महिती देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती , बी. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली आहे.