मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांदरम्यान मध्यरात्री विशेष पॉवरब्लॉक!

146

मध्य रेल्वे मार्गावर दिनांक २८ आणि २९ जानेवारी २०२३ रोजीच्या मध्यरात्री ०२.०५ ते ०४.०५ या वेळेत खडवली आणि आसनगाव दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलासंदर्भात रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे लांबच्या एक्स्प्रेस गाड्या व लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.

वेळापत्रकात बदल

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१५ वाजता कसाऱ्याकरता सुटणारी लोकल ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
  • कसारा येथून ०३.१५ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करता सुटणारी लोकल ठाणे येथून चालविण्यात येईल.

लांब पल्ल्याच्या गाड्या

खालील गाड्या आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा येथे ३५ मिनिटे ते ९५ मिनिटांपर्यंत नियमित केल्या जातील आणि वेळेपेक्षा उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

  • ट्रेन क्रमांक 20104 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल नागपूर मार्गे
  • ट्रेन क्रमांक 12152 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस.
  • ट्रेन क्रमांक 11402 आदिलाबाद – मुंबई एक्सप्रेस
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.