सातारा जिल्ह्यातील (Satara Accident) खटाव तालुक्यामधील धोंडेवाडी येथील पेट्रोल पंपानजीक आज, गुरुवार (१० ऑगस्ट) पहाटे ५ वाजेच्या सुमारास ओमनी कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त हे कुरोली व बनपुरी येथील भाविक असून बाळूमामांचे देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे दर्शनासाठी जात होते.
(हेही वाचा – Medical Colleges : नव्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रभारी अधिष्ठात्यांची नियुक्ती)
यासंदर्भातील (Satara Accident) माहितीनुसार सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख यांच्या ओमिनी कारमधून कुरोली व बनपुरी येथील भाविक बाळूमामाच्या मेंढराचं देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील धोंडेवाडीजवळील सुर्याजीवाडी हद्दीत कार रस्त्याकडेच्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला. या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले, तर चौघेजण गंभीर जखमी आहेत.
या अपघातात (Satara Accident) एक पुरुष व तीन महिला जागीच ठार झाल्या. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये दहिवडी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे.
अपघाताचे वृत्त (Satara Accident) समजताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात तातडीने हलविले. अपघातात ठार झालेल्या तथा जखमी झालेल्यांची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. मात्र, हे सर्वजण बनपुरी व कुरोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात पहाटेच्या वेळेस कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community