Koyana Express Engine Failure : मुंबईहून निघालेल्या कोयना एक्सप्रेसच्या इंजिनचा बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

93

मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कोयना एक्सप्रेस शनिवारी (१२ नोव्हेंबर )संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तारगाव रेल्वे स्टेशनवर बंद पडली. विद्युत इंजिन असणारे रेल्वे इंजिन स्टेशनवर बंद पडल्यामुळे रेल्वे पुढे मार्गस्थ झाली नाही. दिवाळी साजरी करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. (Koyana Express Engine Failure )

मुंबईहून सकाळी साडेआठ वाजता सुटलेली कोयना एक्सप्रेस ११०२९ ही गाडी कोरेगावमध्ये ४.१५ ला आली. त्यानंतर ती पुढे तारगाव रेल्वे स्टेशनला सायंकाळी ४.४५ वाजता पोचले असता रेल्वेचे इंजीन नादुरुस्त होऊन बंद पडली. ती साधारण एक तास त्या ठिकाणीच उभी होती.त्यामुळे रेल्वेतून प्रवासी करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. दिवाळीच्या सणात अचानक निर्माण झालेल्या या अडचणीमुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

(हेही वाचा : Diwali : नरकचतुदर्शी कशी साजरी कराल?)

दीपावलीच्या सुट्टीमुळे मुंबईतील चाकरमानी रेल्वेने कोल्हापूरच्या दिशेने जात असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तारगाव येथे रेल्वे बंद पडली. रेल्वे इंजिन चालकाने बराच वेळ प्रयत्न करून ही रेल्वे इंजिन सुरू झालेच नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने किर्लोस्करवाडी येथून दुसरे इंजिन आणून नंतर रेल्वे पुढे मार्गस्थ होईल, असे सांगितले. त्यामुळे जवळपास दोन तासापेक्षा जास्त काळ प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर अडकून पडावे लागले, तर मसूर- कराड या जवळपास जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेतून उतरून खाजगी वाहनाने घरी जाण्याचे पसंत केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.