मुंबईच्या सतीश भिडे यांचे निःस्वार्थ कार्य; Veer Savarkar यांच्यावर सादर केले तीन हजार कार्यक्रम

50

मुंबईतील (Mumbai) गिरगाव येथील सतीश जनार्दन भिडे (Satish Bhide) यांची स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) या दैवताला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची सतत धडपड सुरू आहे. त्यासाठी ते सावरकरांवर निःशुल्क सांगीतिक कार्यक्रम करतात. आजपर्यंत भारतात आणि परदेशात मिळून भिडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ३१५८ कार्यक्रम मानधन न घेता सादर केले आहेत. स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावरील संगीत कार्यक्रम २५ ऑगस्ट १९८२ पासून सादर करीत असल्याचे भिडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, स्वच्छेने दिलेल्या मानधनाची रक्कम ते सैनिकी शिक्षण शिबिराला दान देतात.

(हेही वाचा – Navi Mumbai Airport भूसंपादन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दणका)

मी मामाला घेऊन नागपूर येथे गेलो. तिथे संघ मुख्यालयात जावून तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे आशीर्वाद घेतले. आणि नंतर कार्यक्रम सुरू केल्याचे भिडे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास या पाऊण तासाच्या कार्यक्रमातून उलगडला जातो. पाच ते सहा गाणी आणि त्यामध्ये निवेदनातून पेरलेले किस्से असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेताना जोसेफ मॅझिनी (Joseph Mazzini) या इटालियन विचारवंताच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर सावरकरांनी केले. भाषांतराला सावरकरांनी दिलेली प्रस्तावना भारतियांसाठी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान ठरली. त्या काळी अनेक क्रांतीकारकांना ही प्रस्तावना पाठ होती. स्वातंत्र्यलढ्यात (Freedom Fight) सहभागी झाले म्हणून सावरकर यांची बॅरिस्टर पदवी काढून घेण्यात आली. अशा अनेक गोष्टी आणि किस्यांद्वारे हा प्रवास कथन केला जातो.

भिडे हे कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे मानधन घेत नसून आयोजकांना केवळ तबला, पेटी व एक गडवाभर पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती करतात. ते सरकारी अभियोक्ता म्हणून निवृत्त झालेले असून जगण्यासाठी निवृत्ती वेतन मिळते. त्यामुळे चरितार्थासाठी कार्यक्रम करीत नाही, असे त्यांनी सांगितले. आवाहन कार्यक्रमानंतर केल्याप्रमाणे कोणी स्व-ईच्छेने अर्पण केलेला निधी सैनिकी शिक्षण मार्गदर्शन शिबिर किंवा त्या अनुषंगाने उपक्रम आयोजित करणाऱ्या नितीनकुमार अशोक म्हात्रे यांना दिला जातो, असेही त्यांनी सांगितले. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.