या आठवड्याच्या शेवटी प्रवाशांचे मेगाब्लॉकमुळे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. शनिवारच्या मध्यरात्री ट्रान्सहार्बर लाईनवर ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान भुयारी मार्गासाठी आरएच गर्डर्स आणि बॉक्स टाकण्यासाठी तर रविवारी दिवा स्थानकावर स्विच पॉइंट, क्रॉस ओव्हर पॉइंट टाकण्यासाठी मेगाब्लॉक आहे.
( हेही वाचा : ‘एमपीएससी’वर आली प्रश्न आणि उत्तरे बदलण्याची नामुष्की! )
शनिवार- ट्रान्सहार्बर लाईनवर मेगाब्लॉक
- ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर मार्गांवर शनिवार २६ मार्च रात्री ११.४५ ते २७ मार्च पहाटे ०५.४५ वाजेपर्यंत ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान भुयारी मार्गासाठी आरएच गर्डर्स आणि बॉक्स टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक मेगाब्लॉक असणार आहे.
- यादरम्यान मध्यरात्री ००.०५ ते ०५.५३ पर्यंत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द केल्या जातील.
- पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्या ०५.२९ वाजेपर्यंत रद्द केल्या जातील.
रविवार- दिवा स्थानकादरम्यान मेगाब्लॉक
- ठाणे – कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० पर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ७.५५ ते सायंकाळी ७.५० या वेळेत सुटणाऱ्या जलद उपनगरीय ट्रेन मुलुंड/ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या ट्रेन्स त्यांच्या वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
- कल्याण येथून सकाळी ८.३६ ते सायंकाळी ७.५० या वेळेत सुटणाऱ्या जलद उपनगरीय ट्रेन कल्याण आणि ठाणे/मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळापत्रकानुसार थांबतील.
प्रशासनाने व्यक्त केली दिलगिरी
हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community