Saudi Arabia ची भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी; Muslim नागरिकांची इस्लामी राष्ट्राकडूनच गोची 

२०२४ मध्ये हज यात्रा करताना तीव्र उष्णतेमुळे अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

154
मक्का – मदिना असलेल्या सौदी अरेबिया (Saudi Arabia) देशाने आता जगभरातील मुसलमानांची गोची केली आहे. या देशाने भारत, पाकिस्तनासह १४ राष्ट्रांमधील नागरिकांना व्हिसा बंदी केली आहे. त्यामुळे हज यात्रेत सौदीला जाणाऱ्या मुसलमानांची चांगलीच कोंडी होणार आहे.
सौदी अरेबियाने (Saudi Arabia) हा निर्णय तात्पुरता घेतला आहे. उमरा, व्यवसाय आंबी कुटुंब व्हिसावर ही बंदी घालण्यात आली आहे. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. जूनपर्यंत हा निर्णय कायम असणार आहे. सौदी अरेबियामधील (Saudi Arabia) अधिकाऱ्यांनी या निर्णयासंदर्भात माहिती देताना सांगितले की, हज यात्रेशी संबंधित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि योग्य नोंदणी केल्याशिवाय देशात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना रोखण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी हज यात्रेत उष्णतेमुळे अनेकांच्या मृत्यूची घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे.
दरम्यान, २०२४ मध्ये हज यात्रा करताना तीव्र उष्णतेमुळे अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच तेव्हा अनेक हज यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तसेच अनेकांनी नोंदणी देखील केली नसल्याची माहिती समोर आली होती. सौदीच्या (Saudi Arabia) निर्णयानुसार भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया, येमेन या देशांवर हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.