Saudi Arabia Visa Ban : सौदी अरेबियाने १४ देशांना व्हिसा केला बंद; यात भारत आहे का?

Saudi Arabia Visa Ban : यात उमराह, व्यावसायिक व घरगुती व्हिसाचा समावेश आहे.

92
Saudi Arabia Visa Ban : सौदी अरेबियाने १४ देशांना व्हिसा केला बंद; यात भारत आहे का?
  • ऋजुता लुकतुके

सौदी अरेबियाच्या राजाने देशात प्रवेशासाठीचे नियम आता बदलले असून एकूण १४ देशांतील लोकांना सौदी अरेबियात प्रवेश नाकारला आहे. यात पाकिस्तान, बांगलादेश आणि भारताचाही समावेश आहे. व्यावसायिक, कौटुंबिक व उमराह व्हिसा हे सध्या स्थगित किंवा निलंबित करण्यात आले आहेत. हज यात्रेसाठीचे व्हिसा मात्र नियमित सुरू आहेत. हजसाठी मुस्लीम समाजाला विशेष व्हिसा मिळतो. त्या व्हिसामुळे यात्रेकरू मक्का व मदिना या धार्मिक स्थळांना भेट देऊन तिथे धार्मिक पूजाअर्जा करू शकतात. भारतीय यात्रेकरूंसाठीही हज व्हिसा सुरू असेल. (Saudi Arabia Visa Ban)

(हेही वाचा – Pakistan Cricket News : पाक क्रिकेट संघाला १० दिवसांत तिसऱ्यांदा दंड, आयसीसीची मोठी कारवाई)

हज यात्रेच्या कालावधीत इतर प्रवाशांचा ओघ थांबवावा यासाठीच इतर प्रकारचा व्हिसा सध्या बंद करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत व्हिसा बंद राहतील. एकदा हज यात्रेचा कालावधी संपल्यावर उमराह, व्यावसायिक व इतर व्हिसा पुन्हा सुरू होतील. हज यात्रेच्या कालावधीत अनधिकृतपणे लोक सौदी अरेबियात येतात. त्यांच्याकडे हज यात्रेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानगी नसतात. अशा लोकांची सौदी अरेबियात गर्दी होते. ती टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सौदीकडून सांगण्यात येत आहे. हज यात्रेसाठी हज व्हिसाबरोबरच हज मंडळाकडे नोंदणी करावी लागते. पण, काही यात्रेकरू ती न करताच मक्का व महिना इथं नोंदणी करतात, असा सौदी अरेबियाचा आक्षेप आहे. शिवाय इतर व्हिसाची मुदत संपल्यानंतरही यात्रेकरू हदसाठी सैदीतच तळ ठोकून राहतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. (Saudi Arabia Visa Ban)

(हेही वाचा – आता महिला तक्रारदारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मदतीला असणार Sakhi Desk)

सौदी अरेबियाचा युवराज मोहम्मद बिन सलमानने व्हिसा प्रशासनाला या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. व्हिसा स्थगित केलेल्या १४ देशांव्यतिरिक्त इतर देशातून येणाऱ्या लोकांना १४ एप्रिलपर्यंत व्हिसा देण्यात येणार आहे. त्यानंतर त्या देशांचा व्हिसाही स्थगित करण्यात येईल. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोमेशिया, इजिप्त, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथियोपिया, ट्युनिशिया व येमेन या देशांचा व्हिसा सध्या स्थगित करण्यात आला आहे. गेल्यावर्षी हज यात्रे दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १,००० यात्रेकरूचा मृत्यू झाला होता. या यात्राच मूळात अनधिकृत होत्या. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे. (Saudi Arabia Visa Ban)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.