दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील सावरकर तायक्वांदो अकॅडमी (Savarkar Taekwondo Academy) येथे कोरियन भाषा प्रशिक्षण (Korean language training) कार्यशाळा संपन्न झाली. ५ आणि ६ मार्च रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेचा ५३ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
(हेही वाचा – UCO Bank CBI Raid : युको बँकेत 820 कोटींचा घोटाळा; CBI कडून 67 ठिकाणांवर छापे)
हंगळ लिपीचे लेखन आणि वाचन
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कोरीयन भाषेच्या हंगळ या लिपीचे (Hangul Script) लेखन आणि वाचन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांची छोटेखानी परीक्षाही घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांना कोरियन भाषेत त्यांच्या आवडीच्या विषयावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आले. या वेळी ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे निबंध लिहिले, असे प्रशिक्षक राजेश खिलारी यांनी सांगितले.
भाषेची अडचण सोडवण्याचा उद्देश
या कार्यशाळेविषयी अधिक माहिती सांगताना राजेश खिलारी म्हणाले की, तायक्वांदो हा दक्षिण आफ्रिकेचा क्रीडाप्रकार आहे. भारतीय खेळाडू अन्य देशांमध्ये स्पर्धेसाठी जातात, तेव्हा अन्य संघाचे प्रशिक्षक त्यांच्या खेळाडूंना काय सूचना देतात, हे भारतीय विद्यार्थ्यांना कळत नाही. तसेच या स्पर्धांच्या कोरीयन भाषेत आलेल्या लिखित सूचना कळत नाहीत. त्या इंग्रजीत भाषांतरित होईपर्यंत वाट पहावी लागते. विद्यार्थ्यांची ही अडचण टाळण्यासाठी सावरकर अकादमीकडून त्यांना कोरीयन भाषा शिकवली जाते. तायक्वांदोच्या प्रशिक्षणात कोरीयन भाषाही शिकवणारी सावरकर अकॅडमी ही एकमेव अकॅडमी आहे. (Savarkar Taekwondo Academy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community