Uttar Pradesh मध्ये गोरक्षकांनी केली १०० गाईंची तस्करांच्या तावडीतून सुटका

38
Uttar Pradesh मध्ये गोरक्षकांनी केली १०० गाईंची तस्करांच्या तावडीतून सुटका
Uttar Pradesh मध्ये गोरक्षकांनी केली १०० गाईंची तस्करांच्या तावडीतून सुटका

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फिरोजाबाद येथील फरीहा परिसरात गोरक्षकांनी १०० हून अधिक गाईंना गो तस्करांच्या (Cow smuggler) तावडीतून सुटका केली आहे. चिरवली गावात एका झाडाला हिंदू (Hindu) धर्मात दैवत मानले जाणाऱ्या गोमात बांधण्यात आल्या होत्या. त्याचवेळी घटनास्थळी हिंदू (Hindu) संघटनांचे काही लोक आले, तेव्हा घटनास्थळांवरून गो तस्करांनी (Cow smuggler) पळ काढला.

( हेही वाचा : Delhi Assembly Election : भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांना खुश करण्यास सज्ज; रालोआ लढविणार भाजपा नाही?

दरम्यान गोरक्षकांना याठिकाणी कुऱ्हाडीसारखी अनेक हत्यारे सापडली. याप्रकरणी हिंदू (Hindu) संघटनांनी पोलिसांच्या मदतीने सर्व गाईंची सुटका करून त्यांना सुखरुपपणे गोशाळेत पाठवले आहे. याचं पार्श्वभूमीवर हिंदू (Hindu) एकता गटाचे शहराध्यक्ष विष्णू ठाकूर म्हणाले की, चिरवली परिसरात गाईंची तस्करी (Cow smuggler) करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही संघटनेच्या गोरक्षकांसोबत घटनास्थळी आलो. तेव्हा वेगवेगळ्या पथकाद्वारे आम्ही प्रकरणाचा शोध घेतला. त्यावेळी अखेर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चिरवली येथील गावाच एका झाडाला गाई बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गो तस्कर गाईंची अवैध तस्करी करत असल्याचे उघड झाले, असे ही ठाकूर म्हणाले. (Uttar Pradesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.