Save Your Phone: उन्हाळ्यात मोबाईल फुटण्याचा अधिक धोका; ‘अशी’ घ्या काळजी

या उन्हाळ्यात मोबाईलच्या बॅटरीची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तो केव्हाही फुटू शकतो. (Save Your Phone)

183
Save Your Phone
Save Your Phone: उन्हाळ्यात मोबाईल फुटण्याचा अधिक धोका; 'अशी' घ्या काळजी

वाढत्या उष्णतेचा नकारात्मक परिणाम माणसांसोबत यंत्रांवर सुद्धा होतो. अनेकदा उन्हात मोबाईल वापरताना तो इतका गरम होतो की हात लावणे सुद्धा शक्य नसते. मोबाईल जर वारंवार अशा प्रकारे गरम होत राहिला तर तो फुटण्याची शक्यता असते. मोबाईल फुटण्याने आर्थिक नुकसान तर होतेच पण शिवाय शरीराला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उन्हाळ्यात मोबाईलच्या बॅटरीची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तो केव्हाही फुटू शकतो. (Save Your Phone)

कशी घ्यावी काळजी? (Save Your Phone)

१. मोबाईल चार्ज करण्यासाठी कोणताही चार्जर वापरणे योग्य नाही. ज्या कंपनीचा फोन असेल त्याच कंपनीचा चार्जर वापरला पाहिजे. असे केल्याने मोबाईलच्या बॅटरीवर ताण येत नाही. (Save Your Phone)

२. मोबाईलच्या बॅटरीवर ताण देणाऱ्या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे स्क्रीन. उन्हातून चालत असताना मोबाईलचा ब्राइटनेस फुल ठेवावा लागतो. मात्र यामुळे बॅटरीवर ताण पडतो. त्यामुळे मोबाईल लवकर गरम होतो. मोबाईलचे तापमान आटोक्यात ठेवण्यासाठी शक्य असेल तेव्हा ब्राइटनेस कमी ठेवा.

३. बरेच लोक मोबाईलची बॅटरी संपायला आली की तो चार्जिंगला लावतात. मात्र या कृतीचा बॅटरीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. ३०-४० टक्के बॅटरी असताना मोबाईल चार्जिंगला लावावा आणि १०० टक्के होण्याआधी बंद करावा. यामुळे बॅटरी लवकर खराब होत नाही. (Save Your Phone)

४. मोबाईल योग्य वेळी चार्जिंगला लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे चार्जिंगला लावण्याची जागा आहे. गरम वातावरणात मोबाईल चार्जिंगला लावणे धोकादायक आहे. अंथरूणावर, चादरीच्या खाली मोबाईल चार्जिंगला लावू नये. सपाट, थंड ठिकाणी चार्जिंगला लावावा.

(हेही वाचा – Apple पाठोपाठ ‘ही’ कंपनीसुद्धा भारतात स्टोअर्स सुरू करण्याच्या तयारीत

५. नियमितपणे जसा मोबाईल चार्ज करता तसेच आणखी एक गोष्ट करायची सवय लावून घ्या. ही गोष्ट दररोज करणे कंटाळवाणे वाटू शकते. मात्र हे करण्याने मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य सुधारते. अनावश्यक फोटो, व्हिडीओ, अॅप्स मोबाईलमधून काढून टाका. गरजेपेक्षा अधिक डेटा स्टोअर केल्याने बॅटरीवर ताण पडतो. त्यामुळे फोन तापू शकतो. (Save Your Phone)

६. जर मोबाईल वारंवार गरम होत असेल तर त्यासाठी पंखा विकत घेऊ शकता. जसा लॅपटॉपसाठी पंखा मिळतो, तसाच मोबाईलसाठी सुद्धा मिळतो. शक्यतो मोबाईलच्या बॅटरीवर ताण देणारी कोणतीही गोष्ट करणे टाळा. बॅटरी गरम झाली नाही तर फोन फुटण्याची शक्यता सुद्धा कमी होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.