‘या’ तीन बँकांमध्ये अकाऊंट असेल तर होणार मोठा फायदा, डिपॉझिटवर मिळणार इतके व्याज

89

ठेवींवर मिळणा-या कमी व्याजदरामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा असते. पण आता एसबीआयसह देशातील तीन प्रमुख बँकांनी मुदत ठेवींवरील (फिक्स्ड डिपॉझिटवरील) व्याजदरात भरघोस वाढ केली आहे. वेगवेगळ्या कालावधीसाठी ठेवण्यात आलेल्या ठेवींवर आता चांगले व्याज मिळणार असल्याने गुंतवणूकदारांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

अ‍ॅक्सिस बँक

खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरांत अ‍ॅक्सिस बँकेने 0.45 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे आता हा व्याजदर 5.60 टक्क्यांवरुन 6.05 टक्के इतका झाला आहे. 17 ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी बँकेने एफडीच्या दरांत वाढ केली असून हे दर 11 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया

एसबीआय बँक- देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने 2 कोटींपेक्षा कमी रुपयांच्या डिपॉझिटवर वेगवेगळ्या कालावधीसाठी तब्बल 15 बेसिस पॉइंटने व्याज वाढवले आहे. त्यामुळे एसबीआय खातेधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यामुळे एफडीवर 2.90 टक्क्यांपासून 5.65 टक्क्यांपर्यंत दराने व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवींवर 3.40 टक्के ते 6.45 टक्क्यांपर्यंत आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरांत वाढ केली आहे. बँक सध्या 2.75 ते 5.55 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. 7 दिवसांपासून 555 दिवसांपर्यंतच्या ठेवींवर हे व्याज देण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.