SBI मध्ये लंच टाईम असतो का? ग्राहकाच्या प्रश्नावर बॅंकेने दिले ‘हे’ उत्तर

स्टेट बॅंक ऑफ इंडियात काम करणारे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये अनेकदा लंच टाईमवरून वादाचे प्रसंग उद्भवतात. स्टेट बॅंक ऑफ इंडियात दुपारच्या जेवणाची अधिकृत वेळ आहे का? यासंदर्भात बॅंकेने ट्वीट करून माहिती दिली आहे. अलिकडे ग्राहक सर्व प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यामातून विचारतात. अशाचप्रकारे एका युजने स्टेट बॅंकेला टॅग करत लंच टाईमविषयी प्रश्न केला तेव्हा बॅंकेने या युजरला काय उत्तर दिले जाणून घेऊया…

( हेही वाचा : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाला दणका! नेमके काय आहे प्रकरण? )

सोशल मीडियावर केली तक्रार

एका युजर बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीला कंटाळून ट्विटरवर अधिकृतपणे तक्रार केली. प्रिय स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंकेचा लंच टाईम किती वेळ चालतो हे मला सांगा गेल्या दीड तासांपासून फक्त दुपारचे जेवण सुरू आहे. आम्ही घरी रिकामी असतो का? आमच्याकडे काम नाही का ? असा सवाल या युजरने ट्विटरवर स्टेट बॅंक ऑफ इंडियाला टॅग करत केला आहे. ग्राहकांच्या या तक्रारीची दखल घेऊन बॅंकेच्या अधिकृत ट्विटरवर रिप्लाय करण्यात आला आहे.

बॅंकेने काय स्पष्ट केले?

तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, आमच्या शाखांमध्ये दुपारच्या जेवणासाठी कोणतीही अधिकृत वेळ नाही. दुपारच्या जेवणावेळी सुद्धा शाखेत ग्राहक येत असतात आणि काम सुरू असते. जर तुम्हाला कोणत्याही शाखेविषयी काही समस्या असेल तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करू शकता असे बॅंकेने स्पष्ट केले आहे. बॅंकेने तक्रार देण्यासाठी लिंक सुद्धा शेअर केली आहे.

या लिंकवर होणार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण

https://crcf.sbi.co.in/ccf/

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here