पेन्शनधारकांसाठी SBI बॅंकेने सुरू केली नवी सुविधा; एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर होतील सर्व कामे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

देशातील सर्वात मोठी बॅंक SBI ने ग्राहकांसाठी आणि विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत आता SBI ग्राहकांना त्यांची पेन्शन स्लिप व्हॉट्सअ‍ॅपवर प्राप्त होऊ शकणार आहे.

( हेही वाचा : पेन्शन धारकांना SBI बॅंकेने दिले मोठे गिफ्ट! घरबसल्या होईल ‘हे’ काम, बॅंकेतही जायची गरज नाही)

पेन्शन स्लिप व्हॉट्सअ‍ॅपवर कशी मिळवाल ?

पेन्शनधारकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पेन्शन स्लिप हवी असल्यास फक्त ९०२२६९०२२६ या क्रमांकवर Hi हा मेसेज लिहून SBI बॅंकेला पाठवावा लागेल.

तुम्ही SBI बॅंकेला Hi मेसेज केल्यावर तुम्हाला बॅंकेकडून तीन पर्याय उपलब्ध करून दिले जातील. या तीन पर्यायांमध्ये बॅलन्स चेक (Balance Inquiry), मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिपचा समावेश आहे.

पेन्शनधारकांना, पेन्शन स्लिप हवी असल्यास तुम्हाला संबंधित पर्यायाची निवड करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला पेन्शन डिटेल प्रोसेस करण्यासंबंधी एक मेसेज येईल आणि तुम्हाला पेन्शन स्लिप मिळेल. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप बॅंकिंगद्वारे बॅलन्स चेक, मिनी स्टेटमेंट आणि डी-रजिस्टर यांसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकता.

स्टेट बॅंकेच्या या सेवेद्वारे तुम्हाला बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटचीही माहिती मिळू शकते. यासाठी ग्राहकांना प्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी खातेधारकांना खाते क्रमांक ७२०८९३३१४८ या मोबाईल नंबरवर स्पेससह WARG असा मेसेज पाठवावा लागेल. सूचनांचे पालन करून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

‘व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट’

दरम्यान, आता सरकारी पेन्शनधारकांना हयातीचा दाखल (Life Certificate) सादर करण्यासाठी दरवर्षी बॅंकेत जावे लागणार नाही. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बॅंकेत फेऱ्या माराव्या लागायच्या याच पार्श्वभूमीवर आता SBI ने नवी सुविधा सुरू केली आहे. SBI च्या या सुविधेचे ‘व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट’ असे नाव आहे. त्यामुळे हयातीच्या दाखल्याचे काम नागरिकांना व्हिडिओ कॉलद्वारे करता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here