ATM मधून पैसे काढण्यासाठी SBI बॅंकेचे नवे नियम!

169

सध्या देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एटीएम(ATM)च्या माध्यमातून सुद्धा अनेकांची फसवणूक होते. यामुळे देशातील सर्वात मोठी बॅंक SBI ने त्यांच्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच एटीएममधून सुरक्षितपणे रोख रक्कम काढता यावी यासाठी SBI बॅंकेने काही नियमात बदल केले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

( हेही वाचा : कोकणात होणारे अपघात विसरा! कारण ती धोकादायक वळणे आता… )

SBI बॅंकेने जारी केले नवे नियम 

ATM मध्ये जाताना तुम्हाला तुमचा मोबाइल कायम सोबत ठेवावा लागणार आहे. कारण एटीएममधून पैसे काढताना तुमच्या Register मोबाइलवर ओटीपी येईल. ओटीपी समाविष्ट केल्यावरच तुम्हाला पैसे काढता येतील. याबाबत SBI बॅंकेने ट्वीट करत माहिती दिली आहे.
पैसे काढताना मोबाइलवर ओटीपी येणार असल्यामुळे सायबर गुन्हे रोखण्यासाठी मदत होईल. १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी हा नियम लागू असेल. १० हजारपेक्षा कमी रक्कम ओटीपीशिवाय काढता येईल. SBI बॅंकेच्या ग्राहकांना रजिस्टर मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.

SBI एटीएममधून पैसे काढताना वापरा ही प्रक्रिया

  • SBIच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड (ATM) मशिनमध्ये इन्सर्ट करावे लागेल.
  • त्यानंतर ओटीपी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमच्या रजिस्टर मोबाइलवर ओटीपी येईल. हा ओटीपी व्हेरिफाय करा.
  • ओटीपी आणि पिन समाविष्ट केल्यावर तुम्ही एटीएममधून सहज रक्कम काढू शकता.
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यावरच तुम्हाला १० हजारांपेक्षा रक्कम काढता येईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.