अलिकडे सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर SBI बॅंकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. SBI ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. यापुढे SBI बॅंकेतून ग्राहकांना पैसे काढायचे असल्यास तुम्हाला ATM मध्ये स्पेशल नंबर अर्थात OTP समाविष्ट करावा लागणार आहे. व्यवहार अधिक सुरक्षिक करण्यासाठी बॅंकेने हे पाऊल उचलले आहे. या नियमांबद्दल जाणून घेऊया…
( हेही वाचा : भारतीय संघाला मिळणार नवे सलामीवीर, रोहित-राहूलचा पत्ता कट?; या ४ खेळाडूंमध्ये चुरस )
SBI बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार आता ग्राहक ओटीपीशिवाय पैसे काढू शकणार नाहीत. यामध्ये पैसे काढण्याच्या वेळी ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर OTP येईल. हा ओटीपी समाविष्ट केल्यावरच ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. बॅंकेने या नियमाबाबत याआधी सुद्धा माहिती दिली होती. परंतु आता SBI सगळ्या ATM मध्ये ही ओटीपी सुविधा सुरू असेल. फसवणुकीपासून संरक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असेल, असे SBI ने स्पष्ट केले आहे.
अशी असेल संपूर्ण प्रक्रिया…
- तुम्हाला ATM मधून पैसे काढल्यावर ओटीपी येईल त्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकणार नाही.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, हा ओटीपी तुम्हाला ATM मध्ये समाविष्ट करावा लागेल.
- ओटीपी चार अंकी असेल, जो ग्राहकांना single transaction साठी उपयोगी पडेल.
- ग्राहकांचे फसवणुकीपासून संरक्षण होण्यासाठी १० हजार किंवा त्याहून अधिक रक्कम काढताना तुम्हाला ओटीपी देणं बंधनकारक असणार आहे.
- ओटीपी आणि पिन समाविष्ट केल्यावर तुम्ही एटीएममधून सहज रक्कम काढू शकता.
- ओटीपी व्हेरिफाय केल्यावरच तुम्हाला १० हजारांपेक्षा रक्कम काढता येईल.