बॅंकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया अंतर्गत ५ हजारांहून अधिक पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पदवीधर उमेदवारांना याद्वारे बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची सुरूवात ७ सप्टेंबर २०२२ पासून झाली आहे.
( हेही वाचा : कायदेशीर अॅप्सची ‘व्हाइटलिस्ट’ तयार करणार! अवैध कर्ज देणाऱ्या अॅप्सचा गैरवापर रोखण्यासाठी निर्णय )
अटी व नियम
- पदाचे नाव – कनिष्ठ सहयोगी/ Clerk
- पदसंख्या – ५ हजार ८
- वयोमर्यादा – २० ते २८ वर्ष
- अर्ज पद्धतील – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ७ सप्टेंबर २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०२२
- अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
- अर्ज शुल्क – या पदांसाठी प्रवर्गानुसार शुल्क भरावे लागेल. General/OBC/EWS या प्रवर्गासाठी उमेदवारांना ७५० रुपये भरावे लागतील तर SC/ST/PwBD/DESM या प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्जशुल्क नाही.
परीक्षा केव्हा होणार
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार या पदांसाठी नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या दरम्यान मुख्य परीक्षा होईल. या पदासाठी उमेदवारांना १९९०० मूळ वेतन मिळेल.
SBI Clerk भरतीसाठी अर्ज कसा कराल ?
- यासाठी उमेदवाराला SBI चे अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर जावे लागेल.
- Career या पेजवर क्लिक करा
- SBI Clerk 2022 apply online यावर क्लिक करा
- यानंतर registration प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल. त्यानंतर एसबीआय क्लर्क परीक्षा ओळखपत्रासाठी लॉगिन तपशील भरा. तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून Application फॉर्म सबमिट करता येईल.