SBI Bank : बॅंकेत पुरेशा सुविधा नाहीत? आता काही मिनिटांत करा तक्रार; SBI ने ट्वीट करत दिली माहिती

गेल्या काही वर्षांमध्ये बॅंकिंग सेक्टमध्ये अनेक बदल होत आहेत. मात्र हे नवीन तांत्रिक बदल होऊन सुद्धा ग्राहकांना अनेक नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी SBI ने पुढाकार घेतला आहे. आपण घरबसल्या काही मिनिटांमध्ये आपली तक्रार नोंदवू शकणार आहोत.

( हेही वाचा : SBI WhatsApp Banking : आता बॅंकेत न जाता व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येतील अनेक कामे; या क्रमांकावर करा SMS)

…येथे नोंदवा तक्रार

ग्राहक https://crcf.sbi.co.in/ccf/ यावर आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहक पर्सनल सेगमेंट अथवा इंडिव्हिजुअल कस्टमर सेक्शनच्या (individual customer section) माध्यमातून आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय ग्राहक टोल फ्री क्रमांक १८०० १२३४, १८०० २१००, १८००० ११ २२११, १८०० ४२५ ३८०० अथवा ०८०-२६५९९९९० यावर आपली तक्रार नोंदवू शकतात. तसेच या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून तुम्ही घरबसल्या बॅंकेशी निगडीत काही महत्त्वाची कामे सहज पद्धतीने करू शकता. या सुविधेमुळे ग्राहकांना रविवारी बॅंक बंद असली तरी एका फोनमुळे रखडलेले काम करता येणार आहे. यासंदर्भात SBI ने ट्वीट करत माहिती दिली आहे.

ट्वीट करत माहिती 

SBIच्या ट्विटरवर अनेक युजर्स आपल्या तक्रारी लिहित असतात. यात एका युजरने सांताक्रुझ पश्चिम ब्रॅंचच्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार केली असता याबाबत रितसर तक्रार वरील दिलेल्या क्रमांकावर किंवा लिंकवर नोंदवावी असे SBI ने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here