पेन्शन धारकांना SBI बॅंकेने दिले मोठे गिफ्ट! घरबसल्या होईल ‘हे’ काम, बॅंकेतही जायची गरज नाही

देशातील सर्वात मोठी बॅंक SBIने ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केलेली आहे. आता सरकारी पेन्शनधारकांना हयातीचा दाखल (Life Certificate) सादर करण्यासाठी दरवर्षी बॅंकेत जावे लागणार नाही. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बॅंकेत फेऱ्या माराव्या लागायच्या याच पार्श्वभूमीवर आता SBI ने नवी सुविधा सुरू केली आहे. SBI च्या या सुविधेचे ‘व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट’ असे नाव आहे. त्यामुळे हयातीच्या दाखल्याचे काम नागरिकांना व्हिडिओ कॉलद्वारे करता येणार आहे.

( हेही वाचा : BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! रोहित नाही, आता ‘या’ खेळाडूला करा कर्णधार; माजी क्रिकेटपटूचे स्पष्ट मत)

ऑनलाईन हयातीचा दाखला 

सरकारी पेन्शनधारकांना त्यांचा हयातीचा दाखला १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान बॅंकेत सादर करावा लागतो. पेन्शनचा लाभ घेणारी व्यक्ती हयात आहे की नाही याच्या पडताळणीसाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. परंतु आता ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

SBI बॅंकेची सुविधा 

सर्वप्रथम पेन्शन धारकांना SBI Pension Seva या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर सर्वात वर असलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला अकाऊंट नंबर सबमिट करावा लागेल. ज्या अकाऊंटमध्ये तुम्हाला पेन्शन येते तोच अकाऊंट नंबर द्यावा लागेल. त्यानंतर कॅप्चा टाका आणि संपूर्ण माहिती भरून चेकबॉक्सवर टिक करा.

आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी येईल. यानंतर आवश्यक असलेला हयातीचा दाखला जमा करा आणि Next वर क्लिक करा. नव्या पेजवर तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ कॉल अपॉईंटमेंट बुक केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला SMS आणि ई-मेल द्वारे confirmation येईल.

दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला व्हिडिओ कॉल कनेक्ट करावा लागेल. तुम्हाला बॅंक अधिकाऱ्यासोबत verfication code निश्चित करावा लागेल. व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला कॅमरा होल्ड करून बॅंक अधिकारी तुमचा चेहरा कॅप्चर करेल. तुमची संपूर्ण माहिती रेकॉर्ड झाल्यावर तुम्हाला मेसेजद्वारे कळवले जाईल. त्यानंतर पेन्शन धारकांना SMC किंवा ई-मेलवर हयातीच्या दाखल्याविषयी माहिती येईल. अशाप्रकारे आता ज्येष्ठ नागरिक घरबसल्या व्हिडिओ कॉलवर हयातीचा दाखला जमा करू शकतात.

पहा संपूर्ण व्हिडिओ 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here