- ऋजुता लुकतुके
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). या बँकेनं मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या ४० कोटीहून अधिक ग्राहकांना स्टेट बँकेनं मोठा झटका दिलाय. बँकेच्या (Bank) एका सेवेसाठी ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा ज्यादा शुल्क आकारावं लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२४ पासून सुरु होणार आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने नेमका काय निर्णय घेतलाय. याचा ग्राहकांना किती फटका बसणाराय, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात एका क्लिकवर. (SBI Savings Account)
SBI ने ATM डेबीट कार्डसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या कार्डचा वापर करण्यासाठी येणाऱ्या वार्षिक देखभाल शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. आता या कार्डचा वापर करण्यासाठी तुम्हाला पुर्वीपेक्षा ७५ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. हा नवीन नियम नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे १ एप्रिलपासून लागू होणार आहे. दरम्यान, बँकेनं हा निर्णय घेऊन देशातील कोट्यावधी ग्राहकांना झटका दिलाय. दरम्यान, SBI च्या या नवीन नियमामुळं ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. (SBI Savings Account)
कोणत्या प्रकारच्या डेबीट कार्डच्या शुल्कात बदल
कोणत्या प्रकारच्या डेबीट कार्डच्या शुल्कात बदल करण्यात आला आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती SBI ने दिली आहे. क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड तसेच गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड्स, माय कार्ड, प्लॅटिनम डेबिट कार्ड यासारख्या डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ करण्यात आलीय. त्यामुळं आता डेबिट कार्ड खिशात ठेवणं पूर्वीपेक्षा महाग झालं आहे. (SBI Savings Account)
(हेही वाचा – Financial Changes : १ एप्रिलपासून तुमचे हे पैशांचे व्यवहार बदलणार)
बदल झाल्यानंतर कोणत्या कार्डला किती शुल्क?
सध्या क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डसाठी जीएसटीसह १२५ रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. मात्र, १ एप्रिलपासून यामध्ये ७५ रुपयांची वाढ करण्यात आलीय. म्हणजे ग्राहकांना आता २०० रुपये द्यावे लागतील. (SBI Savings Account)
युवा, गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्ड या इमेज कार्डसाठी सध्या जीएसटीसह १७५ रुपये द्यावे लागत आहेत. पण आता यामध्येही ७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं १ एप्रिल २०२४ पासून या कार्डसाठी आता २५० रुपये द्यावे लागणार आहेत. (SBI Savings Account)
(हेही वाचा – Mukesh Ambani-Gautam Adani : गौतम अदानी आणि मुकेश अंबानी पहिल्यांदा आले एकत्र)
प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी सध्या ग्राहकांना जीएसटीसह २५० रुपये भरावे लागत आहेत. परंतू तुम्हाला आता जीएसटीसह ३२५ रुपये द्यावे लागणार आहेत. या नवीन नियमाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. (SBI Savings Account)
सध्या प्राइड किंवा प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क जीएसटीसह ३५० आहे. पण यामध्येही आता ७५ रुपये अधिकचे अॅड करावे लागणार आहेत. म्हणजे प्राइड किंवा प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी वर्षाला तुम्हाला ४२५ रुपये द्यावे लागणार आहेत. (SBI Savings Account)
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. त्यामुळं या बँकेकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. मात्र, बँकेने असा निर्णय घेऊन ४० कोटीहून अधिक ग्राहकांना मोठा झटका दिलाय. (SBI Savings Account)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community