SBI म्हणते ‘या’ मोबाईल नंबरवरून फोन आला तर उचलू नका; नाहीतर…

163

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI आपल्या ग्राहकांच्या हिताचा विचार करून नेहमीच त्यांना सतर्क करत असते. ग्राहकांना वेळोवेळी होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांसंदर्भात बँक सावध करत असते. गेल्या काही वर्षात बँकिंग व्यवस्थेत मोठे बदल झाले असून डिजिटलायझेनचे युग असताना सर्वच जण ऑनलाईन व्यवहार प्राधान्यायने करताना दिसत आहे. ऑनलाईन व्यवहाराच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांत मोठी वाढ होताना दिसतेय.

(हेही वाचा  – “मलिकांना मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान”)

गेल्या काही दिवसांपासून बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. फसवणूक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारे सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले असून साधारण ४४ कोटी ग्राहकांना अलर्ट करण्यासाठी बँकेने अधिकृत अकाऊंटवर ट्वीट केले आहे. यावेळी बँकेने सायबर गुन्हेगारांच्या दोन मोबाईल क्रमांकावरून सावध राहण्यास सांगितले आहे.

असे केले SBI ने ट्वीट

बँकेने केले ग्राहकांना अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने सायबर गुन्हेगारांच्या 91-8294710946 आणि +91-7362951973 या दोन क्रमांकांवरून सावध राहण्यास सांगितले आहे. काही दिवसांपासून गुन्हेगार या दोन नंबरवरून कॉल करतात आणि लोकांना केवायसी अपडेट करण्यास सांगतात. त्यामुळे ग्राहकांनी वरील नंबरवर कॉल आल्यास उचलू नये आणि कोणत्याही प्रकारच्या फिशिंग लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असे बँकेने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.