ऑनलाईन व्यवहारांना कोरोना काळात मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहेत. यासाठी डिजिटल बँकिंग सेवा सुधारण्यासाठी प्रत्येक बँक नियमित किंवा मासिक आधारावर बँकेच्या शेड्यूल कामकाजाच्या देखभालीचे कार्य करते. परिणामी ऑनलाइन बँकिंग सेवा निलंबनाबाबत सूचना प्रकाशित करतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) याच अंतर्गत बॅंकिंग सेवा खंडीत करणार आहे.
या सेवा असणार बंद
शनिवारी, 11 डिसेंबर 2021 रोजी, एका विशिष्ट कालावधीसाठी ग्राहक इंटरनेट बँकिंग सेवा वापरू शकणार नाहीत. नियोजित देखभाल कार्यामुळे, SBI ऑनलाइन बँकिंग सेवांचे ग्राहक 300 मिनिटांच्या कालावधीसाठी इंटरनेट बँकिंग, युनो (YONO), युनो लाईट (YONO Lite), युनो बिजनेस (YONO Business) आणि युपीआय UPI या सेवा वापरण्यास अक्षम असतील.
300 मिनिटे व्यवहार राहतील बंद
SBIने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे घोषणा केली आहे की ‘आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना विनंती करतो की, आम्ही एक चांगला बँकिंग अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 23.30 ते 04.30 तासांपर्यंत अर्थात 300 मिनिटे तंत्रज्ञान अपग्रेड करणार आहोत. या कालावधीत, INB (इंटरनेट बँकिंग/ YONO / YONO Lite / YONO व्यवसाय / UPI अनुपलब्ध असेल. आम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि तुम्ही आमच्यासोबत राहण्याची विनंती करतो.’ दुसरीकडे, SBI ने SBI, YONO पोर्टलवर आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाची सूचना प्रकाशित केली आहे. बँकेने “https://sbiyono.sbi/index.html” वर सांगितले आहे की, ‘हे SBI, YONO वेब पोर्टल 1 डिसेंबर 2021 पासून बंद करण्यात आले आहे. तुम्ही YONO मोबाइल अॅपवर आमच्या सेवांचा आनंद घेणे सुरू ठेवू शकता.’
( हेही वाचा : बापरे! मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण! राज्यभर ‘इतके’ झाले रुग्ण )
Join Our WhatsApp CommunityWe request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience. pic.twitter.com/LZsuqO2B0D
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 10, 2021