ऑक्सिजन वितरणासाठी नॅशनल टास्क फोर्स बनवा! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 

राज्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज व पुरवठा यांचे मुल्यांकन करा, ऑक्सिजन वितरणासाठी नॅशनल टास्क फोर्स बनवा, हा टास्क फोर्स ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे यांच्या वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवील, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. 

125

वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरातील राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरातील राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरता नॅशनल टास्क फोर्स बनण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामध्ये एकूण १२ सदस्यांचा समावेश असणार आहे. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

काय म्हटले सर्वोच्च न्यायालायने? 

  • राज्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज व पुरवठा यांचे मुल्यांकन करा.
  • ऑक्सिजन वितरणासाठी नॅशनल टास्क फोर्स बनवा.
  • यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ, देशभरातील नामांकीत डॉक्टर्स आणि केंद्रीय मंत्रालयातील सचिव असतील.
  • हे टास्क फोर्स ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे यांच्या वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवतील.

(हेही वाचा : मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती!)

हे असतील टास्क फोर्सचे सदस्य!

  • डॉ. भाबातोष बिस्वास, कुलगुरू, आरोग्य विद्यापीठ, पश्चिम बंगाल
  • डॉ. देवेंद्र सिंग राणा, अध्यक्ष, सर गंगाराम हॉस्पिटल, व्यवस्थापन मंडळ
  • डॉ. देवी प्रसाद शेट्टी, अध्यक्ष, नारायण हेल्थ केअर, बंगळुरू
  • डॉ. गंगादीप कांग, प्रो. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, तामिळनाडू
  • डॉ. जे.व्ही. पेटर, संचालक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, तामिळनाडू
  • डॉ. नरेश त्रेहान, संचालक, मेदांता रुग्णालय, गुरुग्राम
  • डॉ. डॉ. राहुल पंडित, संचालक, फोर्टिज हॉस्पिटल, मुलुंड
  • डॉ. झरीर एफ उडवाडिया,  ब्रीच कँडीमधील चेस्ट फिजिशियन
  • डॉ. सुमित्रा रावत, अध्यक्ष, शस्त्रक्रिया विभाग, सर गंगा राम हॉस्पिटल
  • डॉ. शिव कुमार सरीन, प्रो. दिल्ली युनिव्हर्सिटी
  • सचिव, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
  • सचिव, आयकर विभाग
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.