बहुचर्चित ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासात घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची नावे त्यात समोर येत असून, त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे सहा राखीव सदनिका परस्पर विकल्या आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
म्हाडाच्या माध्यमातून बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. वरळीतील बीडीडी चाळ क्रमांक ८४ आणि १०० येथील सहा वर्गखोल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात या सहा खोल्यांचाही समावेश असून, त्यांचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला आहे. मात्र, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सहा वेगवेगळ्या व्यक्तींना या सदनिका हस्तांतरित केल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – BJP vs AAP : राष्ट्रपतींकडून सेवा विधेयकाला मंजुरी, आप देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान)
कारवाई सुरू
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तत्कालीन संचालक, उपविभागीय अभियंता, तत्कालीन व्यवस्थापक आणि तत्कालीन चाळ अधीक्षक यांनी संगनमताने हा प्रताप केल्याचे कळते. त्यामुळे गैरव्यवहाराचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community