पुण्यातील सुप्रसिद्ध ग्राहक पेठेने यंदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून मोरिया बोटीतून मारलेल्या ऐतिहासिक उडीचा देखावा साकारला आहे. (Veer Savarkar) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या हस्ते २० सप्टेंबर या दिवशी या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
(हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या फोटोवर अजित पवार यांची स्पष्टोक्ती, म्हणाले …)
ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव तर्फे हा देखावा साकारण्यात आला आहे. (Veer Savarkar) ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांची ही संकल्पना आहे. अध्यक्ष मनिष शिंदे, कार्याध्यक्ष भीमाशंकर मेरू, उपाध्यक्ष राजू बालेश्वर, खजिनदार दीपाली विंचू यांसह सजावट कलाकार प्रफुल्ल जाधवर, धर्मेश पिप्पलिया, उदय जोशी, शैलेश राणिम, चंदा येरवा, अर्चना भोकरे, संजय बनकर, रायबान आडेवार यांनी याकरिता परिश्रम घेतले आहेत. पारले जी कंपनीने याकरिता विशेष सहकार्य केले आहे. ३० हजार बिस्किटांसह चॉकलेट आणि गोळ्यांचा वापर देखील यामध्ये करण्यात आला असून तो पाहण्याकरिता लहान मुलांसह गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे. (Veer Savarkar)
यंदा सावरकरांना आदरांजली – सूर्यकांत पाठक
सूर्यकांत पाठक म्हणाले, ”गेली अनेक वर्षे बिस्कीट व चॉकलेटचा देखावा साकारण्याची परंपरा ग्राहक पेठेने यंदाही कायम ठेवली आहे. लहान मुलांकरिता हा देखावा नेहमीच आकर्षण ठरतो. सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून मोरिया बोटीतून मारलेल्या ऐतिहासिक उडीने इतिहास रचला. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि सावरकरांविषयी संपूर्ण जगाला माहिती मिळाली. त्यामुळे यंदा देखील ३० हजार बिस्किटे, ५ ते ६ किलो गोळ्या व चॉकलेट वापरून हा देखावा साकारत सावरकरांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.” (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community