SCERT च्या खासगी शाळांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रच

44

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) जाहीर केलेल्या वेळापत्रकाऐवजी शहरातील अनेक खासगी विनाअनुदानित (Private Unsubsidized Schools) व स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी आपल्या आधी ठरविलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा (Exam) घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही खासगी शाळा (Private Schools) याला अपवाद असून, त्यांच्यासह अनुदानित शाळांनी ‘एससीईआरटी’च्या सूचनांनुसार वेळापत्रकात बदल केले आहेत.

(हेही वाचा – Mhada मुंबईसह राज्यभर १९,४९७ घरे बांधणार; किती कोटींची केली तरतूद?)

‘एससीईआरटी’ने नुकतेच शालेय वेळापत्रक जाहीर करून, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिल या कालावधीत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात नववीची परीक्षा ८ एप्रिल ते १९ एप्रिल, आठवीची परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल, सहावी आणि सातवीची परीक्षा १९ ते २५ एप्रिल, पाचवीची परीक्षा ९ ते २५ एप्रिल, तिसरी आणि चौथीची परीक्षा २२ ते २५ एप्रिल, तर पहिली आणि दुसरीची परीक्षा २३ ते २५ एप्रिल या कालावधीत घेणे अपेक्षित आहे.

तसेच, खासगी अनुदानित व शासकीय शाळांना नियतकालिक मूल्यमापन चाचणीच्या (Evaluation test, पॅट) प्रश्नपत्रिका ‘एससीईआरटी’ कडून दिल्या जाणार आहेत. मात्र, काही खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी ‘एससीईआरटी’ने (SCERT) ठरवून दिलेल्या वेळापत्रकाऐवजी, त्यांनी पूर्वी तयार केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यायचे ठरवले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.