अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची इच्छा असणा-या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणा-या मुलींना दरवर्षी 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. देशात तंत्र शिक्षण घेणा-या मुलींच्या संख्येत वाढ व्हावी म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून(एआयसीटीई) हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
5 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
प्रगती शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाराष्ट्रासह सर्व राज्यातील विद्यार्थिनींना आपल्या गुणवत्तेच्या आधारावर ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. संपूर्ण देशातील 5 हजार विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग शाखेत डिप्लोमाच्या प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय शाखेत प्रवेश करणा-या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दहावीत मिळालेले गुण तसेच प्रवेश घेताना असणा-या पात्रता गुणांवर ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थिनींना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
(हेही वाचाः फक्त याच लोकांना भरावा लागेल घरभाड्यावर जीएसटी, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण)
राज्यात 624 विद्यार्थिनींना होणार फायदा
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थिनींना याचा फायदा होणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 624 विद्यार्थिनींना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थिनींना नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आणि एआयसीटीईच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community