School Bags : विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार ? पहा, काय आहे डिजिटल स्मार्ट बॅग ?

88
School Bags : विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार ? पहा, काय आहे डिजिटल स्मार्ट बॅग ?
School Bags : विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार ? पहा, काय आहे डिजिटल स्मार्ट बॅग ?

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु असून, वेगवेगळे उपक्रमही राबविले जात आहेत. मात्र बदलता अभ्यासक्रम, पुस्तकांची वाढती संख्या व स्पर्धेमुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढतच आहे. हीच बाब लक्षात घेऊन नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित अश्विननगर येथील होरायझन इंटरनॅशनल अकॅडमीतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या संदेश मनोज जगताप या विद्यार्थ्याने एका ‘डिजिटल स्मार्ट बॅग’ची (Digital Smart Bag) डिझाइन तयार केली आहे. (School Bags)

(हेही वाचा – Jagdeep Dhankhad: विरोधकांचा सभात्याग! सभापती म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, संविधानाला…”)

भविष्यात ही ‘बॅग’ विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अशा या ‘स्मार्ट बॅग’च्या डिझाइनचे पेटेंट नुकतेच संदेशच्या नावे भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाकडे नोंदविले गेले असून, तसे प्रमाणपत्रही त्याला प्राप्त झाले आहे.

चाकांच्या मदतीने सहज ओढता येऊ शकते

सध्या प्रत्येक पाल्य आणि पालकांना सतावणारा प्रश्न म्हणजे दप्तराचे ओझे. हे पाठीवरचे ओझे कमी झाले पाहिजे, यासाठी शासनासह विविध शैक्षणिक संस्थांकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संदेश जगताप या विद्यार्थ्याने अनोख्या ‘स्मार्ट बॅग’ची डिझाइन तयार केली आहे. ही बॅग वजनाने हलकी असेल. खांद्याला न लावता चाकांच्या मदतीने सहज ओढत नेता येऊ शकते.

दप्तराच्या अतिरिक्त वजनामुळे विद्यार्थ्यांना होणारे मानेचे, पाठीचे आजार कमी करण्यास अशा प्रकारच्या ‘स्मार्ट बॅग’ची नक्कीच मदत होईल, असा विश्वास संदेशने व्यक्त केला आहे. या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते संदेशला गौरविण्यात आले. शाळेच्या प्राचार्या रिचा पेखळे यांनीदेखील संदेशचे कौतुक केले. (School Bags)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.