ठाणे (Thane), रायगडसह (Raigad) राज्यभरात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय काही जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट (Red Alert)’ ही जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (School Closed)
(हेही वाचा – Worli Spa Murder Case : शरीरावर लिहिलेली ‘ती’ २२ नावे आणि हत्या झालेल्या गुरुचे काय होते कनेक्शन?)
ठाणे, रायगड जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच नागरिकांची गैरसोय झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या ओसांडून वाहत आहेत, प्रशासन प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. (School Closed)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community